
प्रेसनोट:-
75 वा संविधाना दिना निमित्त सामूहिक संविधान वाचन तसेच भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते
भारतीय समाज सेवा मंडळ पंचशील बुद्ध विहार सौ शीला नगर येरवडा येथे 75 वा संविधान दिनानिमित्त भव्य असे सामूहिक संविधान वाचन व रॅली काढण्यात आली या प्रसंगी लोकांनी उत्स्फूर्त असे रॅलीमध्ये सहभागी होऊन सविधान दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला प्रसंगी संविधान उद्धेशिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा आणि भारतीय संविधान प्रत यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ॲड अतुल सोनावणे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान आणि नुकतीच झालेली विधानसभा निवडणूकीत पैशाने विकत घेतलेल्या मताचे बाजारीकरण या वाईट गोष्टी घातक आहे त्यामुळे राजकारणातील सेवाभावी वृत्ती संपुष्टात येत आहे. आणि भारतीय संविधानाचा दुरूयोग होताना दिसत आहे असे मनोगत वक्त केले. हिंदू युवा क्रांती संघटनेचे सचिव अनिल जमदाडे यांनी सांगतले कि हा मसुदा तयार करताना उपस्थित असणाऱ्या लोकांनी संविधानाची सुरुवात कशी करावी असे विचारले असताना अनेक धर्माच्या लोकांनी अनेक नावे सांगितली परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या संविधानाची सुरुवात आम्ही भारतीय लोक या वाक्याने करावी असे सुचवले त्यानंतर यास उपस्थिनानी मंजुरी दिली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. अतुल राज साळवे यांनी कार्यक्रमास उपस्थिती असणाऱ्या ना घटनेत असणाऱ्या महत्वाचे मुलतत्वे याचाही माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना संजय धायगुडे यांनी केले व हे संविधान लागू होण्यासाठी येरवडातील मा राज साळवे यांनी पंतप्रधान पंडित नेहरूंची गाडी येरवडा येथे अडवली होती याची आठवण करून दिली या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते पत्रकार संतोष शिंदे मच्छिन्द्र भिंगारदिवे, अशोक केदारी, राजेश कानडे, समीर सोनावणे, बौध्दचार्य विजय राजरत्न, रमा मोरे, सरिता कानडे, रेखा केदारी, आशा मोरे, सुरेखा धायगुडे, अश्विनी सोनावणे, राणी चव्हाण, विद्या पवार, मीना कानडे, संगीता शिंदे आणि इतर महिला सभासद मोठया संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना संजय शंकर धायगुडे यांनी केले. भारतीय समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष धनराज भिंगारदिवे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.