आठवण तुमची काळजात कोरली...!
सन्माननीय माझे मार्गदर्शक, मित्र ऋत्विक सर आपण आज या जगात नाहीत विश्वास बसत नाही, आपण जे मला केलेलं मार्गदर्शन आहे ते मी सदैव आठवणीत ठेवील, पण खरंच सर तुम्ही खूप लवकर हे जग सोडून गेलात हो तुम्हाला अजून खूप जगायचं होत माझ्या सारख्या अनेक मुलांना तुम्हाला घडवायचं होत, जिथे चुकलं तेथे दुरुस्त करायचं होत, तुम्ही मागील 8 वर्षापासून स्नेहालय संचालित संजयनगर पुनर्वसन प्रकल्पात काम करत होते पण मी या प्रकल्पामध्ये तुमच्या सोबत घालवलेल एक वर्ष मला कितीतरी वर्षा सारखं वाटलं, तुम्ही तुमच्या किशोर वयातच अनेक संघर्ष करून आणि तुमच्या संजयनगर च्या समुदाय प्रतिनिधी पदावर पोचलो होते आणि तुम्ही मला सांगायचे की जितेश सर मला अजून खूप पुढे जायचं आहे मला माझ्या संजयनगर समुदायाचा विकास करायचा आहे मी जे सोसलं ते माझ्या पुढच्या पिढीने नाही सोसलं पाहिजे त्यासाठी तुम्ही अनेक संघर्ष करत राहिलात, वयाच्या 24 व्या वर्षी तुम्ही भारत आणि बांगलादेश सायकल यात्रेचे प्रतिनिधित्व केले, एखाद्या phd झालेल्या प्राध्यापकाला तुम्ही तुमच्या ज्ञानाने चीत करू शकत होते एवढे तुम्ही ज्ञान संपादन केले, मला आठवतात ते दिवस जेव्हा तुम्ही संजयनगर मध्ये आम्हाला मार्गदर्शन करायचे अनेक वेळा तुम्ही माझ्या चुका दुरुस्त केल्या, संगणकातील काही तांत्रिक बाबी जर मला समजल्या नाही त्या मला समजाऊन सांगितल्या समाजातील लोकांचे दुःख ओळखून त्यांच्यावर केस स्टडी कशी करावी हे तुम्ही मला शिकवलं एवढेच नव्हे तर एका शिक्षकाच्या आणि विद्यार्थ्याच्या नात्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही मला भाऊ म्हटलं, मला ती सुद्धा गोष्ट आठवते की तुम्ही मला म्हटलं होत की मला चंद्रपूर च्या महाकालीचे दर्शन घ्यायचे आहे आपण कधी सुट्ट्या मिळाल्या तर जाऊ असे देखील तुम्ही मला वचन दिलं होत आणि हो मला हे देखील आठवत की तुम्ही माझ्या घरी वाशिमला गेले होते तेथे तुम्ही माझ्या सर्व कुटुंबाची भेट घेतली आणि माझ्या लहान भावाला चांगला अभ्यास कर आणि मोठा हो अस सांगितलं आणि पण आज तुम्ही आम्हाला अर्ध्यात सोडून गेले पण आठवण मात्र आयुष्याची ठेऊन गेले, मला माझ्या जीवनामध्ये अनेक मार्गदर्शक भेटले पण तुम्ही एकमेव असे आहात की जे माझे समवयस्क होते मित्र होते, ज्या प्रमाणे झाडाचे फुल तोडले की झाडाला शोभा नसते त्याच प्रमाणे आज तुम्ही संजयनगर वासियांना आम्हा सर्वांना सोडून गेले तर आमची जणू शोभाच गेली, मला खंत या गोष्टीची वाटते की आपण मला मागील 2 महिन्यापासून संजयनगरला भेटीसाठी बोलवत होता पण मला वाटलं तुम्ही कुठे जाणार नंतर भेटता येईल अजून आहे मी नगरला एक वर्ष पण मला ते पुढचे वर्ष तुम्ही नसताना तुमच्या मार्गदर्शना विना घालायचं आहे हे आता मला कळून चुकलं आहे मी तुम्हाला भेटलो नाही एवढं बोलावलं तरी आलो नाही याचं गोष्टीचं मला दुःख असेल, आज तुम्ही सोडून जरी गेलात तरी कायमच्या आठवणी मनात कोरून ठेवून गेलात, तुमची खूप आठवण येईल सर....भावपूर्ण श्रद्धांजली ऋत्विक लोखंडे सर...
तुमचाच विद्यार्थी
जितेश कांबळे (वाशीम )