आमदार बबनराव लोणीकर यांना राज्याच्या मंत्रिमंडळात घेऊन जालना जिल्ह्याच पालकत्व मिळाव.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता जालना जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लाखो नागरिकांची भावना.
आमदार बबनराव लोणीकर यांना राज्याच्या मंत्रिमंडळात घेऊन जालना जिल्ह्याच पालकत्व मिळाव.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता जालना जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लाखो नागरिकांची भावना.
परतूर प्रतिनिधी :-
भाऊसाहेब पाटील मुके -
महाराष्ट्र राज्यातील गावा गावातील करोडो महिला पुरुष वृद्ध दिव्यांग युवक युवती विद्यार्थी बालक गावाबाहेर रस्त्याच्या कडेला शौचालयास जात होती. प्रचंड किळसवाणी घाण राज्यातील प्रत्येक गावाच्या सुरुवातीलाच आढळून यायची. या अतिशय घाण प्रकारामुळे राज्यभरात नेहमीच आजाराची साथ कायम असायची. राज्यभरात पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे नेहमीच होत असलेल्या आजारामुळे राज्यातील हजारो नागरिकांचा बळी महिन्याकाठी जात होता. राज्यभरातली दवाखाने तुडुंब भरलेली असायची.
परंतु 2014 ला महायुतीची सत्ता महाराष्ट्रात येताच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देवेंद्रजी फडणवीस यांच्या हाती येताच त्यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याची जबाबदारी आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर सोपविली. आमदार बबनराव लोणीकर यांनीही मिळालेल्या संधीचं सोनं करत मूर्त अवस्थेत पडलेल्या पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याला नव संजीवनी देण्याचे काम करत महाराष्ट्र राज्यात सुमारे एक कोटी स्वच्छतागृह बांधण्या करिता प्रति स्वच्छता ग्रह सुमारे 12000 रुपये निधी अनुदान प्रति लाभार्थ्यांना दिल. यामुळे महाराष्ट्र राज्याला हागणदारी मुक्त करण्याचं श्रेय जाते ते म्हणजे तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार बबनराव लोणीकर यांना.
महाराष्ट्र राज्याला हागणदारीमुक्त करण्याबरोबरच त्यांनी महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळाव आरोग्याच्या दृष्टिकोनातून राज्यभरात ही संकल्पना राबवण्यात त्याकाळी खूप महत्त्वाचं होत. राज्यभरात पसरलेलं घाणीचं साम्राज्य आणि राज्यभरातील नागरिकांना पिण्याचे अशुद्ध पाणी यामुळे उद्भवणाऱ्या नेहमीच्या आजाराच्या साथी ला कायमचं बंद करण्याकरिता तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार बबनराव लोणीकर यांनी राज्यभरात मराठवाडा वॉटर ग्रीड नावाची योजना राबविण्याच धोरण आखल याकरिता त्यांनी विदेशात जाऊन अनेक देशात त्यांनी तत्कालीन तज्ञ अधिकारी वर्गासह अभ्यास दौरा आयोजित केला. राज्यभरातील खेड्यापाड्यातील गावगाड्यातील तांडेवाड्या वस्तीवरील आणि खेड्यापाड्यातील शाळात महाविद्यालयात व शासकीय कार्यालयासह मुला-मुलींच्या वस्तीगृहात शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्याचा हेतू ठेवून. राज्यभरात मराठवाडा वाटर ग्रीड ही महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी राबविली. राज्यभरातल्या सर्वच शहरात तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार बबनराव लोणीकर यांच्या संकल्पनेतून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ लागला. हळूहळू या योजनेचा व्यापक विस्तार होऊन राज्यभरातल्या अनेक तालुक्यात ही योजना यशस्वीपणे राबवली गेली. तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार बबनराव लोणीकर यांच्या खांद्यावर पडलेली जबाबदारी त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण यशस्वीपणे सांभाळली.
याबरोबरच परतुर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने आमदार लोणीकरांनी तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पदाच्या कार्यकाळात सुमारे 4000 कोटी रुपये निधी मतदार संघात आणून परतुर विधानसभा मतदारसंघातील परतुर शहरात रेल्वेचा भव्य उड्डाणपूल, क्रीडा संकुल, स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी नाट्यगृह, वंदनीय विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे वस्तीग्रह, तालुका व जिल्हा सत्र न्यायालयाची परतुर शहरातील भव्य देखणी इमारत, परतुर शहरातील उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिकेची इमारत याबरोबरच परतूर शहरात शेकडो अद्यावत स्मशानभूमी बांधण्याबरोबरच परतूर शहरातील गल्लोगल्लीत सिमेंटचे रस्ते बांधकाम या निधीतून पूर्ण झाले असून उर्वरित कामे पूर्णत्वास जात आहेत. यासह मंठा शहरातही कोर्टाची भव्य देखणी इमारत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे वस्तीग्रह, देवी रोड बांधण्याबरोबरच मंठा शहरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आमदार लोणीकर यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून आणलेल्या निधीतून सुटला असून मतदारसंघातही तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार बबनराव लोणीकर यांच्या संकल्पनेतून शेगाव ते पंढरपूर दिंडी महामार्ग अनेक जिल्हा मार्ग महामार्ग व गावागावाला जोडणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दर्जेदार मजबूत टिकाऊ रस्ते परतूर विधानसभा मतदारसंघातील गावागावात पहावयास मिळत आहे.
वैयक्तिक लाभाच्या योजनेतही राज्यभरात परतुर विधानसभा मतदारसंघ अव्वल आहेच असं म्हणणं वावगं ठरणार नाही कारण परतुर विधानसभा मतदारसंघात गेल्या वर्षभरात पंतप्रधान आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, शबरी आवास योजनेच्या माध्यमातून
आमदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष पर्यत्नातून सुमारे 25 हजार घरकुल मंजूर झाली आहेत. याबरोबरच मागील त्या शेतकऱ्याला सिंचन विहीर उपलब्ध करून देत असताना आमदार लोणीकर यांच्या माध्यमातून मतदारसंघात सुमारे 5000 सिंचन विहिरी शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याबरोबरच दिव्यांग बांधवांनी निराधारांची काळजी कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे आमदार लोणीकर यांनी घेतली असून परतुर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना 15 लाख रुपये किमतीचे साहित्य आमदार लोणीकर यांनी गेल्या महिन्यात वाटले असून याबरोबरच मंठा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना पंधरा लाख रुपये किमतीचे सह उपकरण साहित्य आमदार लोणीकर यांनी स्वतःच्या हस्ते वाटप केले आहे. याबरोबरच परतूर विधानसभा मतदारसंघातील निराधार वृद्ध यांना शासनाच्या वतीने आधार मिळावा म्हणून मंठा परतूर शहरात वेळोवेळी कॅम्प आयोजित करून मतदार संघातील सुमारे 27 हजार वृद्ध व निराधारांना मासिक मानधन मिळावी म्हणून त्यांनी सतत तहसील कार्यालय मंठा परतूर व जालना येथे दरमहा आढावा बैठकी घेऊन सतत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठकी घेऊन निधी उपलब्ध करून दिला दिला असल्याने ते कष्टकरी शेतकरी शेतमजुरा बरोबर वृद्ध व दिव्यांगाचे ही आधारस्तंभ बनले आहेत.
गेली 40 वर्ष ते भारतीय जनता पक्षात अशी अत्यंत निष्ठेने काम करत असून. जालना जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी कामगार गोरगरीब पीडित वंचित विस्थापित याबरोबरच विद्यार्थ्यांच्याही न्याय हक्का करिता ती गेली 40 वर्ष अविरत संघर्ष करत आलेलं एक अनुभवी नेतृत्व जालना जिल्ह्याला लाभलं आहे. 2024 च्या या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभेच्या जागेवर महायुतीचे पाचही उमेदवार विजयी झाल्याने पुन्हा जालना जिल्ह्यावर बाहेरचा पालकमंत्री लादण्याचा गंभीर प्रसंग जिल्ह्यावर येऊ नये. जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता अनुभवी कुशल अभ्यासू नेतृत्व असलेले परतूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बबनराव लोणीकर यांना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी द्यावी अशी अपेक्षा. परतुर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांची असल्याची बोलले जात आहे. आमदार बबनराव लोणीकर यांना मंत्रिमंडळातून डावलन म्हणजे जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला डावलन हे असंच होईल अशी भीती जिल्हाभरातल्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे.