logo

परतूर पोलिसांनी मोटार सायकल चोरी करणारे चोर पकडले.

परतूर पोलिसांनी मोटार सायकल चोरी करणारे चोर पकडले.
परतूर (प्रतिनिधि) :-
भाऊसाहेब पाटील मुके -
परतूर पोलिसांना काल दि. २६ च्या रात्री गोपनीय माहिती च्या आधारे माणिक महातारबा पवार वय १९ वर्ष व गणपत वाघ्या पवार (फरार) दोन्ही रा. पारधी वस्ती परतूर याचे ताब्यात चोरीच्या २ मोटार सायकल मिळून आल्या आहेत. त्यापैकी एक परतूर येथून चोरी केलेली आणि एक घनसावंगी येथून चोरी केलेली अशा २ मोटार सायकल मिळून आल्या आहेत. तसेच २ मोटार सायकल परतूर येथे बेवारस स्थितीत मिळून आल्या आहेत. त्यापैकी मिरभाईंदर मुंबई येथील आणि बनगार्डन पुणे येथील असल्याचे समजले आहे. संबंधित पोलिस स्टेशन येथे कळवून कारवाई केली आहे.
परतूर शहरासह परिसरात मोटार सायकल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास परतूर पोलिसांनी मुद्देमालासह शीताफिने अटक केली असून या आरोपीने दोन मोटार सायकल चोरल्याचे कबुल केले आहे.
आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम.टी.सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे , पोलीस कॉन्स्टेबल सतीश जाधव, दीपक आडे, अच्युत चव्हाण, गोविंद पवार, धर्मा शिंदे, चालक धोत्रे यांनी यशस्वी केली आहे.

0
2770 views