राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धात यवतमाळच्या खेळाडुने पटकावले 21 पदके
राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा ही नाशिक येथे दिनांक 23 व 24 नोव्हेंबर रोजी संपन्न झाली या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत यवतमाळ येथील स्पोर्ट् कराटे असोसिएशन यवतमाळ डिस्ट्रिक्ट, च्या विद्यार्थ्याने प्रशिक्षक सेन्साई चंद्रशेखर भिमटे यांच्या मार्गदर्शनात 13 गोल्ड मेडल व 8 सिल्वर मेडल असे एकूण 21 पदके पटकावत घवघवीत यश संपादन केले यामध्ये खेळाडु रितीजा भगत 2 गोल्ड, रीशिता भगत 2 गोल्ड, आरोही जीवतोडे 1गोल्ड 1 सिल्वर, ओम गुजरकर 2 गोल्ड, आनंद देवकते 2 गोल्ड, अखिलेश एलरवार 2 गोल्ड, मानव राठोड 1गोल्ड 1 सिल्वर, सौम्य बन्सोड 2 सिल्वर, कृष्णा वासू 1 गोल्ड 1 सिल्वर, पदके पटकावत यवतमाळ शहराचे नाव उंचावले. यास्पर्धेत भारतातून वेगवेगळ्या राज्यांनी सहभाग नोंदवला या खेळाडूंना होते. यशस्वि खेळाडू यवतमाळनगरीत आल्यावर एक छोटे खाना कार्यक्रम आयोजित करून किट्स संचालिका दुबे मॅडम व पालकवर्ग यांच्या उपस्थितीत खेळाडूंचा भव्य सत्कार करण्यात आला.