पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मातोश्री, मुंबई येथील पत्रकार परिषदमध्ये मांडलेले मुद्दे!
"आजच्या निकालाने धक्का बसला आहे, पण जिंकलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करतो. महाविकास आघाडीला सहकार्य करणाऱ्यांचे मी आभार मानतो. मात्र, भाजपचे 'वन पार्टी' दिशेने चाललेले आक्रमक धोरण लोकशाहीसाठी चिंताजनक आहे," असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.