logo

उद्धव सेनेच्या जिल्हा प्रमुखांचा ; शिंदे सेनेत प्रवेश......

जळगाव :
विधानसभेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देऊन, शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. उद्धव सेनेतील अंतर्गत वादामुळे मंगळवारी भंगाळे यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुखांकडे सादर केला. या राजीनाम्यानंतरच भंगाळे यांच्यावर उद्धव सेनेकडून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र काढण्यात आले.

विष्णू भंगाळे यांनी मंगळवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला. यावेळी भाजपचे आमदार सुरेश भोळे हे देखील उपस्थित होते. विष्णू भंगाळे यांचा राजीनामा उद्धव सेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर विष्णू भंगाळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. मात्र, विधानसभेच्या शेवटच्या टप्प्यातच भंगाळे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याने उद्धव सेनेला धक्का दिला आहे.

दरम्यान, विष्णू भंगाळे यांनी राजीनामा देताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून एक पत्र प्रसारित करण्यात आले. त्यात जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

27
1743 views