दोन गटात हाणामारी, एकाचा मृत्यू,.......
जळगाव : मतदान करून परतणारेसिद्धार्थ माणिक वानखेडे (३५, रा. राजमालती नगर) यांना मारहाण करण्यात आल्याने त्यात मयत सिद्धार्थ त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्यांनाही मारहाण करण्यात आल्याने व दगडफेक झाल्याने सहा जण जखमी झाले. ही घटना बुधवारी (२० नोव्हेंबर) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सुरत रेल्वे फाटकाजवळ घडली. या प्रकरणी माजी नगरसेवक राजू पटेल यांच्यासह सहा जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सात ते आठ जणांना ताब्यात घेतले आहे.या संदर्भात फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, राजमालती नगर परिसरातील दोन गटांमध्ये जुना वाद आहे. बुधवारी सकाळी सिद्धार्थ वानखेडे हे मतदान करण्यासाठी जात असताना त्यांना राजू पटेल याने शिवीगाळ केली व ते परत येत असताना त्यांना राजू पटेल व त्याच्या साथीदारांनी अडविले. हे समजताच सिद्धार्थ यांचे शालक विशाल अजय सुरवाडे (२८, रा. राजमालती नगर) हे तेथे पोहचले. मात्र टोळक्याने 'याचे बायपास झाले असून याच्या छातीवर मारा' असे म्हणत सिद्धार्थ यांना लाकडी दांडका व ठोशा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात ते जखमी होऊन रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तसेच भांडण सोडविण्यासाठी गेलेले विशाल यांनाही मारहाण केली.