logo

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी महेश ढमढेरे

शिक्रापूर : पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनेक वर्षे पदाधिकारी असलेले आणि नुकतेच काही घडामोडीमुळे अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले महेश अरविंद ढमढेरे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील महेश अरविंद ढमढेरे यांना नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी नियुक्तीपत्र दिले आहे. दरम्यान निवडीबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय धोरणे व विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महेश ढमढेरे यांनी सांगितले.

1
4625 views