रिसोड मालेगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज
महेंद्रकुमार महाजन
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज
रिसोड : 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.19 नोव्हेंबर रोजी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समीती मध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्य वाटपाची नियोजन करण्यात आले होती. येथून महामंडळाच्या बसने निवडणूक अधिकारी व कर्मचारी आपापल्या बूथकडे रवाना झाले आहेत. रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण 323623 मतदार असून त्यापैकी 168377 पुरुष तर 155246 महिला मतदार आहेत. अपंग मतदारांची संख्या 2834 असून 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 3608 आहे. अपंग आणि वृद्ध मतदारांनी यापूर्वीच मतदान केले आहे. या मतदारांच्या मतदानासाठी 350 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये रिसोड तालुक्यात 182 तर मालेगाव तालुक्यात 168 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.मतदान प्रक्रियेसाठी एकूण 1450 मतदान कर्मचारी असून त्यामध्ये 35 प्रादेशिक अधिकारी आणि 35 पोलिस प्रादेशिक अधिकारी आहेत. निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना बुथवर पोहोचणे व मतदान प्रक्रिया संपल्यानंतर परत आणण्याकरिता 38 महामंडळाच्या बसेस आणि 59 खाजगी वाहनांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक्षा तहसीलदार रिसोड, दीपक पुडें तहसीलदार मालेगाव, सतीश शेवदा मुख्याधिकारी नगर परिषद रिसोड या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.