logo

निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांनी निवडणूक साहित्य वाटप ठिकाणाचा घेतला आढावा

निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांनी निवडणूक साहित्य वाटप ठिकाणाचा घेतला आढावा

रिसोड : 20 नोव्हेंबर रोजी होउ घातलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रिसोड मालेगाव विधानसभा 33 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे.रिसोड मालेगाव विधानसभा अंतर्गत येणाऱ्या बूथ वरील कर्मचाऱ्यांना दिले जाणारे साहित्य हे रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओट्यावरून साहित्य वाटप होणार आहे. या ठिकाणी साहित्य वाटपाची सुविधा केली गेली असून या ठिकाणीच स्ट्रॉंग रूम सुद्धा उभारण्यात येणार आहे. ज्यामध्ये ईव्हीएम मशीन बॅलेट मशीन व आदी साहित्य ठेवले जाणार असून या ठिकाणावरून दिनांक 19 नोव्हेंबर रोजी झोनल अधिकारी व बूथ कर्मचारी हे आपले साहित्य या ठिकाणावरून घेऊन जाणार आहेत. सदर जागेची पाहणी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांनी आपल्या अन्य कर्मचाऱ्यांसोबत या ठिकाणी पाहणी केरत आढावा घेतला काही महत्त्वाच्या सूचनाही यावेळी देवकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहे.

2
449 views