logo

रिसोड येथे स्वीप पथकाच्या माध्यमातून मतदान जनजागृती अभियान

रिसोड येथे स्वीप पथकाच्या माध्यमातून मतदान जनजागृती अभियान

रिसोड : जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांचे आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक्षाताई तेजनकर,स्वीप पथकाचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी बी.एल.कोकाटे यांचे मार्गदर्शनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक रिसोड येथे स्वीप पथकाच्या माध्यमातून मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.मतदार राजा तू जागा हो,लोकशाहीचा धागा हो...अशा विविध घोषणाद्वारे मतदान टक्केवारी वाढवण्याकरिता शासनाच्या स्वीप पथकाच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. यावेळी मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत मतदान गीत,नाटिका आणि अभिनय या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम पथकाचे सदस्य राजू नामदेव मोरे,ज्ञानोबा कोंडीबा मुसळे, दिलीप माधवराव गाडे यांनी नाटिकेद्वारे मतदानाचे महत्त्व सांगितले. बी.एल.ओ प्रदीप जाधव आणि कटारे यांनी मतदान कर दादा, मतदान कर या गीता द्वारे मतदानाची महती गायली.यावेळी मतदान जनजागृती करण्यासाठी उपस्थित मतदारांना मतदान प्रतिज्ञानुसार जात,धर्म,पंथ,भाषा,समाज यांच्या प्रभावाखाली न येता आणि कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निष्पक्षपातीपणे मतदान करावे.तसेच भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार मतदान करून बजवावा व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. असे यावेळी स्वीप नोडल अधिकारी बी.एल. कोकाटे यांनी सांगितले.यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार केंद्रप्रमुख राजेंद्र गिरी आभार यांनी मानले.

14
3180 views