logo

मनशांती स्नेहकुंज सोबत

पनवेल : वाढदिवस आपण नेहमी साजरे करतो , पण एक वेगळं समाधान मिळण्यासाठी कुठेतरी वेगळ्या निवांत ठिकाणी , जिथे शांतता असेल प्रसन्न वाटेल आणि विशेष म्हणजे वेगळच समाधान लाभेल. त्या निमित्ताने सौ.अशा रत्नकांत म्हात्रे यांनी 16 नोव्हेंबर आपला वाढदिवस संगीता नितीन जोशी सामाजिक विकास संस्था यांच्या स्नेहकुंज आधार गृह येथे ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा केला. श्री नितीन जोशी व सौ संगीता नितीन जोशी हे सामाजिक उपक्रम द्वारे नेहमी समाजसेवा करीत आहेत. पनवेल मधील नेरेपाडा येथे त्यांनी आपल्या जोशी निवास मध्ये हे स्नेहकुंज आधार गृह गेली 2012 पासून अविरत सुरू ठेवलेले आहे. सध्या त्यांच्याकडे 35 ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष मोठ्या आनंदाने गुण्यागोविंदाने राहत आहेत. इथली व्यवस्था चोख व उत्तम आहे. स्वच्छता सुंदर व नीटनेटकी आहे तसेच सर्व कर्मचारी आनंदाने हे काम करीत आहेत. त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येकाला येथे प्रसन्न वाटून एक वेगळीच मनशांती लाभते. याचे सर्व श्रेय श्री व सौ जोशी यांना जाते. सौ आशा रत्नकांत म्हात्रे या मानव संसाधन अधिकारी म्हणून भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड तळोजा येथील कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. कंपनीने त्यांच्या योगदानाबद्दल एक्सलन्सी अवॉर्ड देऊन त्यांना गौरविण्यात आलेले आहे. सध्या त्या मानव संसाधन व्यवस्थापन याविषयी ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन करीत असतात. व त्यांनी आपले पती श्री रत्नकांत म्हात्रे यांच्यासोबत स्नेहकुंज आधार गृह मधील ज्येष्ठ नागरिकांसहित सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीचे सात्विक गोड चविष्ट जेवण देऊन हा वाढदिवस सर्वांसोबत मोठ्या आनंदात साजरा केला. येथील ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. आपला वेळ सत्कारणी लागला याचे समाधान श्री व सौ म्हात्रे यांना लाभले. सर्वांना त्यांनी आवाहन केले आहे की आपण वर्षातून एक वेळ नक्की स्नेहकुंज मध्ये काही क्षण घालवावे आणि एक वेगळीच मनशांती अनुभवावी. आणि या समाजसेवी संस्थेला हातभार लावावा. तिथला संपर्क क्रमांक आहे. 8425845684

24
2954 views