logo

इंदापूर येथे शरद पवार यांची हर्षवर्धन पाटील यांचेसाठी सोमवारी प्रचाराची सांगता सभा.

इंदापूर येथे शरद पवार यांची हर्षवर्धन पाटील यांचेसाठी सोमवारी प्रचाराची सांगता सभा
•वाघ पॅलेस मैदानावरती 12.30 वा.होणार!
•खा.सुप्रिया सुळे उपस्थित राहणार
•शरद पवार कोणावर तोफ डागणार ?
•शरद पवार यांची इंदापूर तालुक्यात लाट

इंदापूर : प्रतिनिधी दि.17/11/24
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, संघर्ष योद्धा खा. शरद पवार यांची पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराची सांगता सभा इंदापूर येथे वाघ पॅलेस शेजारील भव्य मैदानावरती सोमवारी (दि.18) दुपारी 12.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. या सभेला खा.सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ नेते खा.शरद पवार यांचे इंदापूर तालुक्यावर विशेष लक्ष असल्याने ते या सभेत विरोधकांवर कोणती तोफ डागणार ? याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
सध्या खा.शरद पवार यांची इंदापूर तालुक्यामध्ये लाट निर्माण झालेली आहे. तसेच दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन भाऊ पाटील यांचेबद्दलही मतदारांमध्ये सहानुभूती दिसून येत आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट अंदाज सर्व्हेतून व्यक्त केले जात आहे.
खा.शरद पवार यांनी केलेल्या राज्यव्यापी निवडणुक प्रचार दौऱ्यास जनतेकडून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रात सत्ता बदल करायचाच व तो होणारच! अशी ग्वाही शरद पवार आता भाषणातून देत आहे.
गद्दारांना सुट्टी नाही असे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्रभर सभा गाजवलेले खा.शरद पवार इंदापूरच्या प्रचाराच्या या सांगता सभेत काय बोलतात? याकडे इंदापूर तालुक्याचे लक्ष लागून राहीले आहे.
खा.शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या ऐतिहासिक सभेस इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
--------
हर्षवर्धन पाटील यांचेबद्दल जनतेत मोठी सहानुभूती!
--------------------------------------------
हर्षवर्धन भाऊ पाटील यांचेबद्दल गेल्या काही दिवसांपासून जनतेमध्ये मोठी सहानभूती दिसून येत आहे. या सहानुभूतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, हर्षवर्धन पाटील यांचेसाठी जनतेने व युवकांनी निवडणूक हाती घेतल्याचे चित्र दिसत आहे. तसेच दुसऱ्या बाजूला खा. शरद पवार व खा.सुप्रियाताई सुळे यांनी इंदापूरच्या या निवडणुकीत विशेष लक्ष घातले आहे, त्यामुळे इंदापूर तालुक्यातील वातावरण तुतारीमय झाले आहे. खा.शरद पवार यांच्या होणाऱ्या प्रचाराच्या या सांगता सभेने गावा-गावातील कार्यकर्त्यांना आणखी ऊर्जा प्राप्त होणार आहे.
_______________________________

6
318 views