logo

मांडवगण फराटा येथे पुन्हा बिबट्याचा कहर व नागरिकांमध्ये घबराट......

प्रतिनिधी रमेश बनसोडे. दिनांक १५/११/२०२४ रोजी मांडवगण फराटा येथे पुन्हा बिबट्याचा कहर आणी हळहळ
मांडवगण फराटा पासून सुमारे 3 ते 4 km अंतरावर भयानक घटना घडली. टेंभेकर वस्ती येथील ही घटना.या परिसरात घरांच्या आंगणाभौवती लहानसा चिमुकला खेळत असता. बिबट्याच्या हलल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली.माहितीनुसार मुलाचे नाव शिवतेज समाधान टेंभेकर ( वय ४ वर्ष ) रा. फराटेवाडी. मांडवगण फराटा . ता.शिरूर.जिल्हा.पुणे.मृत्यू झाल्याचे मुलाचे नाव आहे
घटना सविस्तर नुसार संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे कळते. नरभक्षक बिबट्याने लहान चिमुकल्यावर हल्ला करून फरफटक नेले.यामुळे ह्या वस्तीत राहणारे नागरिकांमध्ये दुःख व्यक्त होत आहे.

अंगणात खेळत असता अचानक दबा धरून बसलेला नरभक्षक येतो व हल्ला करून मानेला धरून तो ऊसाच्या शेतात फरफटत नेहतो. आजूबाजूचे शेजारी लोक पाहता क्षणी त्याच्या मागे लोक ओरडत गेले.सुमारे दोन तीन तासाने मृत्यू देह ऊसाच्या शेतात सापडतो.पण अशा प्रकारे मिळेल अशी अपेक्षा कोणी नाही केली.धड मुंडके वेगळे असे मृत्यू देह सापडला.हे दिसताच नागरिक आक्रमक झाले.ही घटना झाली तरी वन अधिकारी घटना स्थळी दाखल झाले नाहीत.यामुळे वन विभागाच्या विरोधात नागरिकांनी राग व्यक्त केला आहे.
ह्या नरभक्षक बिबट्याला मानवाच्या रक्ताची चटक लागली असल्याने तो मानवी वस्तीत दबा धरून बसलेला असतो. आता नागरिकच एकमेकांना सावधतेचा इशारा देत आहे. बिबट्या पासून सावध रहा.

9
2933 views