महायुतीचे उमेदवार श्री.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रचारार्थ चोपडा येथे भव्य जाहीर सभा...!
चोपडा विधानसभा महायुती तथा शिवसेना अधिकृत उमेदवार श्री.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रचारार्थ चोपडा येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.
चोपडा जिल्हाध्यक्ष (Aima media):-
“महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024” अनुषंगाने रावेर लोकसभा अंतर्गत चोपडा विधानसभा साठी महायुती तथा शिवसेना चे अधिकृत उमेदवार श्री.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या प्रचारार्थ आज चोपडा शहर येथे मंत्री श्री.गुलाबरावजी पाटील, शिवसेना नेते व सिने अभिनेते श्री.गोविंदा व खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत "भव्य जाहीर सभा" पार पडली.
यावेळी मतदारांशी संवाद साधून प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन करण्यासाठी महायुती उमेदवार श्री.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.