जनता मराठी प्राथमिक विद्यामंदीर पिंपळगाव सराई शाळेतील विद्यार्थी व शिक्षक बंधू भगीनींनी दिला मतदान करण्याचा संदेश
पिंपळगाव सराई, बुलढाणा, महाराष्ट्र : (प्रतिनिधी)
आज दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ आणि वार शनिवार रोजी सकाळी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर जनता मराठी प्राथमिक विद्यामंदीरातील विद्यार्थ्यांनी व शिक्षक कर्मचार्यांनी पिंपळगाव सराई गावातील जनतेला येणार्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी सर्वांनी मतदान करण्याचे आव्हान केले.या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निर्मला देवराव खुर्दे मॅडम शाळेचे शिक्षक मंगेश दामोदर तरमळे,विवेक मोहन गवते,राजेंद्र शिवाजी वायाळ,वनिता विलास खंडारे ,किरण अशोक तरमळे,मनिषा संदीप खंडारे ,माधुरी दिपक डोईफोडे व गावातील नागरीक उपस्थित होते.लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मतदान जागृती विषयी विविध स्लोगन च्या माध्यमातून समाजापर्यंत संदेश पोहचेल असा प्रयत्न केला.सौ.खुर्दे मॅडम यांनी येणाऱ्या लोकशाहीच्या महोत्सवात आपल्या भागातील जास्तीत जास्त संख्येने मतदान कसे होईल या साठी जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.