जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांना निवडणूक आयोगाची मान्यता
अहिल्यानगर : जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी पाठविलेल्या जिल्ह्यातील सर्व १२ मतमोजणी केंद्रांना भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. २३ नोव्हेंबर रोजी या मतमोजणी केंद्रांवर संबंधित विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी होणार आहे.
अकोले विधानसभा मतदार संघासाठी मिटींग हॉल तहसील कार्यालय नवीन इमारत (ता. अकोले), संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल (ता. संगमनेर), शिर्डी – प्रशासकीय इमारत, तळमजला, तहसील कार्यालय राहाता, कोपरगाव – सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल, तळमजला, (ता. कोपरगाव), श्रीरामपूर – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, पहिला मजला (ता. श्रीरामपूर) येथे मतमोजणी होईल.
नेवासा मतदारसंघासाठी न्यू गव्हर्नमेंट ग्रेन गोडाऊन, उत्तर बाजू खोली क्र. २ संथ मेरीस् स्कुल रोड, मुकुंदपुरा नेवासा फाटा, ता.नेवासा, शेवगाव – शासकीय इमारत तळमजला तहसील कार्यालय शेवगाव, राहुरी – लोकनेते रामदास पाटील धुमाळ न्यु आर्टस सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेज राहुरी इनडोअर स्पोर्ट्स हॉल राहुरी, पारनेर – औद्यागिक प्रशिक्षण संस्था वर्कशॉप पारनेर, अहमदनगर शहर – महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन नं.६ एम.आय. डी.सी. नागापूर अहिल्यानगर, श्रीगोंदा - गव्हर्नमेंट ग्रेन गोडाऊन नं.३, पेडगाव रोड श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी बॅडमिंटन हॉल, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे मतमोजणी होईल. सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.