logo

मतदान जागृती साठी जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पथनाट्य सादरीकरण .

पिंपळगाव सराई , बुलढाणा , महाराष्ट: दि.१६ (प्रतिनिधी )

स्थानिक जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथील विद्यार्थ्यांनी शासन परिपत्रकानुसार SVEEP अंतर्गत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी व मतदानाची जनजागृती करण्यासाठी जनता विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहकार्याने आज चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, व गावात ठिकठिकाणी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले . या पथनाट्यातून आणि विविध उपक्रमातून गावातील नागरिकांना मतदान करण्यासाठी संदेश देण्यात आला.

पथनाट्याचे सादरीकरण गावातील चौका चौकात करण्यात आले.त्याला गावातील नागरिकांनी नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला .पथनाट्य सादरीकरणाचे वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते त्यामध्ये मदनराव गवते , साहेबराव गवते, लक्ष्मण पाटोळे कॅप्टन बाजीराव सोनोने, भाऊराव गवते, सौ.ताराबाई सोनोने , प्रमोद सोनोने ,एकनाथ गवते, एकनाथ सुरोशे, पुरुषोत्तम गवते, अनंत भालेराव, गिरीश भालेराव, रामेश्वर गवते, गुलाबराव पाटोळे, अशोक गवते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती .

या कार्यक्रमाचे संयोजक सुदाम चंद्रे हे होते . पथनाट्याचे दिग्दर्शन विद्यालयाचे कलाशिक्षक रवींद्र खांनंदे यांनी केले . या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराजजी भाला तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोदजी ठोंबरे, पर्यवेक्षक भगवानराव आरसोडे यांनी मार्गदर्शन केले.तसेच या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे शिक्षक गजानन पाटोळे प्रा. सुधाकर सस्ते यांचे सहकार्य लाभले

57
3927 views