logo

निष्ठावंत उमेदवारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रचारासाठी आज गावात.....

शिरूर.वडगाव रासाई. प्रतिनिधी रमेश बनसोडे . दिनांक रोजी


१४/११/२०२४ विधानसभेचा प्रचारासाठी अनेक जण प्रयत्न करीत आहे.जो तो निवडणुकीच्या प्रचारासाठी स्टार .अभिनेता बोलवित आहे.आपला प्रचार कसा होईल ते पाहत आहे.कोणी कोणी आपल्या उमेदवारासाठी खर्च जेवण देत आहे.कसाही करुन आपला माणूस निवडून आणणे हे सर्व जण पाहत आहे.अशाच प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या उमेदवारासाठी शिरूर येथील वडगाव रासाई येथे आले होते.त्यांच्या सभेसाठी शिरूर हावेलितील शेतकरी वर्ग.तरुण वर्ग.कामगार.मोठ्या संख्येने महिला वर्ग. व्यवसायिक अशांनी भरपूर प्रमाणात आपली उपस्थिती दाखवली.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष ( तुतारी ) शरद पवार निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांसाठी फिरत आहे.अनेक प्रचार दरम्यान लाखोने वडीलधारे.प्रचंड संख्येने महिला.तरुण लोक सभेला भाग घेत आहे. प्रचारमधील विचार ऐकत आहे.शरद पवार प्रचार दरम्यान बोलत होते की आपल्याला चांगल्या लोकांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा ही आपेक्षा सर्व सामन्याची आहे.त्याची पूर्तता आम्ही करू.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रचाराची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रावसाहेब पवार यांच्या शिरूर तालुक्यातील योगदान विषयी बोलले.
पुढे शरद पवार बोलले शिरूर तालुक्यातील शेती सुधारली आहे. दुधाचा धंदा वाढला आहे.कारखाने.औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहेत.ह्या सर्व गोष्टी मुळे तालुक्याचा चेहरा पूर्ण पणे बदला आहे.ह्यामुळे मी आंनंदी आहे.
शिरूर हवेली तालुक्यातील जबाबदारी अशोक पवार यांच्या खांद्यावर होती ती त्यांनी फार चांगल्या प्रकारे पर पाडली आहे.हे सर्व बोलत असताना शरद पवारांनी शाबासकीची थापट मारली.

पक्षात फूट
पक्षात फूट पडली तेव्हा दुसऱ्या पक्षात येण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पण अशोक पवार यांनी मझ्याबरोबर राहणे पसंत केले.अशा निष्टवंताच्या मागे ठाम पणे उभे रहा.सर्वजण ताकदीने पाठिंबा द्या. मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे काम करा.असे अनोवादन केले.
प्रचार दरम्यान नक्कल बाजी
निवडणुकीच्या काळात व बऱ्याच वर्षापासून कारखाना बंद आहे.यामुळे काही शेतकरी वर्ग नाराज आहे.कामगार.सदस्य.सामान्य जनता नाराज आहेत पण हा घोडगंगा सहकारी कारखाना बंद का आहे.हे सांगत असता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सभेत अजित पवार यांची नक्कल करून पोलखोल केली
काही लोकांनी पैसे असूनही.पैसे मंजूर होऊनही थांबवले.
साखर कारखाना सुरू करून दिला नाही. मी स्वतः बँकेशी बोललो.मुख्यमंत्र्यांशी बोललो.त्यांनी सांगितले माझी अडचण आहे.ते तुम्ही समजून घ्या.हे सर्व मी समजून घेतले हा दम कोणी दिला आहे.आणि कोण आहे. कारखाना कसा चालू होतो तेच पाहतो.निवडून कसा येतो तेच पाहतो.सर्व शेतकरी लोकांनी घोडगगा सहकारी साखर कारखाना सुरू केला.तो सहकारी साखर कारखाना अजित पवार यांनी बंद पाडला.असा आरोप शरद पवार यांनी केला. सत्ता आल्यास आपण स्वतः लक्ष घालून लवकर सुरू करू याची खात्री करून दिली.आपल्या अशोक रावसाहेब पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून दाखवा.प्रतिनिधी - रमेश बनसोडे




14
52 views