logo

माझे व्हिजन.. मावळच्या विकासाचं साधन.. असा नारा देत बापु अण्णा भेगडे यांनी केला प्रचाराला सुरवात.

माझे व्हिजन.. मावळच्या विकासाचं साधन..
नमस्कार, रामकृष्ण हरी.

माझं व्हिजन मवाळ क्षेत्र समृद्ध, संपन्न, शांत आणि सुरक्षित बनवण्याचं आहे. खास करून, मला पाणी आणि स्वच्छतेच्या विषयावर खूप काम करायचं आहे. आपल्याकडे दोन महत्वाच्या नद्या आहेत – इंद्रायणी आणि पावना माता नदी. या नद्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण त्या क्षेत्रातील लोकांची पाणी पुरवठा करतात. पण, अजूनही खूप लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही. हे बदलण्यासाठी, मला स्वच्छ पाणी योजना सुरु करायच्या आहेत.

इंद्रायणीच्या तीरावर असलेल्या तकाराम महाराजांच्या तीर्थक्षेत्रात, लोक अजूनही अशुद्ध पाणी पितात. यासाठी स्वच्छ पाणी पुरवठा करणं, वेस्टेज पाणी व्यवस्थापन करणं, आणि स्वच्छता प्रकल्प उभारणं हे अत्यंत आवश्यक आहे. पवना धरणाजवळील पाणी स्वच्छ करण्यासाठी फिल्टर प्लांट उभारले पाहिजे, जेणेकरून अधिक लोकांना चांगलं पाणी मिळू शकेल. यासाठी नगरपालिका, ग्राम पंचायत आणि इतर स्थानिक स्तरावर काम करणे आवश्यक आहे.

माझं उद्दीष्ट आहे की, या नदी प्रकल्प आणि पाणी व्यवस्थापनाच्या कार्याला चालना मिळावी, आणि यामध्ये महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारचे योगदानही असावे. आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे शक्य होईल. मी ठरवलं आहे की या कामासाठी मी प्रचंड मेहनत घेईन आणि लोकांसोबत एकजुट होऊन काम करणार आहे.

0
272 views