logo

हातात तिरंगा ध्वज अन् मुखात देशभक्तिपर घोषणांचा ध्वनी

तुमसर शहरात तिरंगा फ्लॅग रूट मार्चच्या माध्यमातून १३ नोव्हेंबर रोजी नागरिकांमध्ये देशभक्ती, एकता आणि सांविधानिक अधिकाराचा आदर वाढविण्याचा संदेश देण्यात आला. या उपक्रमाने केवळ देशभक्तीची भावना जागविली नाही, तर लोकशाहीच्या प्रक्रियेतील नागरिकांची भूमिका किती महत्त्वाची आहे हेदेखील अधोरेखित केले.

राष्ट्रप्रेमाच्या भावना प्रकट करीत तिरंगा फ्लॅग रूट मार्चची सुरुवात भव्य मिरवणुकीने झाली. ज्यात विविध क्षेत्रांतील नागरिकांनी सहभाग घेतला. नागरिकांच्या हातात तिरंगा ध्वज होता. मुखात देशभक्तीपर घोषणांचा ध्वनी गाजत होता. मिरवणुकीतून
देशाच्या विविधतेतील एकता

आणि राष्ट्रीय एकात्मतेचा

संदेश देण्यात आला. यामध्ये

जिल्हाधिकारी संजय कोलते,

पोलीस अधीक्षक नुरूल

हसन, अतिरिक्त पोलीस

अधीक्षक कातकडे, तुमसर

उपविभागीय पोलीस अधिकारी

गोफणे, ठाणेदार आचरेकर,

एसएसबी फोर्स, राजस्थान

पोलीस, भंडारा पोलीस,

तहसीलदार टिकले आणि

महापालिका प्रशासन उपस्थित

होते. या अधिकाऱ्यांनी

नागरिकांना त्यांच्या जबाबदाऱ्या

समजावून दिल्या. कायदा

व सुव्यवस्था राखण्याचे,

शांततेत मतदानप्रक्रियेचे पालन

करण्याचे आवाहन केले.

109
2816 views