logo

ऑल इंडिया मीडिया असोसिएशन न्यूज संतोष विरुद्ध संतोष आणि जनतेत असंतोष कळमनुरी मतदार संघ

संतोष विरुद्ध संतोष आणि जनतेत असंतोष कलमनुरी मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी कुरुक्षेत्र बनले आहे. संतोष बांगर आणि संतोष टारफे हे आता समोरासमोर भिळणार आहे. संतोष बांगर हे आपल्या विधानातून आणि कृतीतून सतत चर्चेत असतात. शिवसेनेत झालेल्या बंडाच्या वेळेस प्रसार माध्यमाशि प्रतिक्रिया देताना संतोष बांगर हे आपले अश्रू आवरू शकले नव्हते ते प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले उद्धव बालासाहेब ठाकरे यांच्या सोबत गद्दारी करत बंडखोरी केली आहे. त्या आमदारांना त्यांची बायको सुद्धा सोडून जाईल. त्यांच्या मुलांना कोणी बायका सुद्धा देणार नाही. असे वादग्रस्त वक्तव्य संतोष बांगर यांनी केलं होते. पण काही दिवसानंतर संतोष बांगर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडत. एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. संतोष बांगर यांची भूमिका आणि त्यांचे वक्तव्य सदैव चर्चेचा विषय असतात. आपल्या आक्रमक शैलीमुळे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनुकीवरून प्रत्येक वेळेस ते अडचणी सापडले आहे. संतोष बांगर हे त्यांची शैली त्यांना इतरांपेक्षा ही वेगळी दर्शविते. संतोष बांगर हे त्यांचा राजकीय प्रवास ते शिवसेनेतून सुरू झाला ते नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. संतोष बांगर त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे २०१९ मध्ये शिवसेने कडून कळमनुरी विधानसभा मतदारसंघांतून तिकीट देण्यात आलं या निवडणुकीत संतोष बांगर यांना ८२५१५ आणि वंचित चे अजित मगर यांना ६६१३७ काँग्रेसचे डॉक्टर संतोष टरफे यांना ५७१०४ मते पडली होती २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत संतोष टारफे हे निवडून आले होते. संतोष बांगर यांचा विजय हा शिवसेनेसाठी महत्त्वाचा होता. संतोष बांगर यांनी कोरोना काळामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी आपली ५० लाखाची ऐपडी त्या पैशातून त्यांनी औषध उपचार उपलब्ध करून दिला. मागील वेळेस झालेल्या अतिवृष्टीच्या वेळेस संतोष बांगर स्वतः पुरामध्ये उतरून शेतकरी कुटुंबांना पुरा मधून आळकलेल्या बाहेर काडताना दिसले त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वायरल झाला होता. संतोष बांगर यांनी मोठी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज २४ऑक्टोबर रोजी दाखल केला होता.संतोष बांगर हे त्यांची शैली त्यांना इतरांपेक्षा ही वेगळी दर्शविते. संतोष बांगर हे त्यांचा राजकीय प्रवास संतोष बांगर यांच्या विरोधात असलेले संतोष टारफे नेमके आहे तरी कोण हे पाहूया डॉक्टर संतोष टारफे हे आदिवासी नेते आहे. यवतमाळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे ते जावई असून शिवाजीराव मोघे आदिवासी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहे. त्यांच्या कन्या हिंगोली जिल्हा परिषद सदस्य आहे. कलमनुरी विधानसभा मतदारसंघ आदिवासी मतदारांचा मोठा वर्ग आहे. २०१२ पासून ते काँग्रेसमध्ये काम करत आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून डॉक्टर संतोष टारफे यांनी विजय मिळवला आहे. संतोष टारफे यांनी २०१९मध्ये सुद्धा संतोष बांगर यांना विधानसभेमध्ये आव्हान दिला होत. पण त्यावेळी ते मोठ्या मताधिकाने पराभूत झाले. बांगर हे प्रथम क्रमांकावर होते. बांगर यांच्या पाठोपाठ वंचित चे उमेदवार अजित मगर हे दुसरे क्रमांक वर होते. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर संतोष टारफे यांना मते मिळाले होते. त्यानंतर मात्र संतोष टारफे यांनी काँग्रेस पक्ष सोडूनत आपल्या हाताला शिव बंधन बांधले आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत संतोष बांगर यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे. वंचित चे २०१९ चे उमेदवार अजित मगर यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केले आहे. तया दोघांनाही शिवसेना गटामध्ये आता या दोघांना शिवसेना ठाकरे गटात घेतानी संतोष बांगर यांना मोठा श्रेय मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे कळमनुरी येथील कार्यक्रमात संतोष टारफे हे विधानसभेचे उमेदवार असतील असे जाहीर केले आहे. तेव्हापासूनच संतोष टारफे हे निवडणुकीच्या तयारीला लागले होती. शिवसेनेची पहिली यादी जेव्हा जाहीर झाली त्यात संतोष टारफे यांचं नाव बघून सुषमाताई अंधारे यांचे शब्द खरे ठरले आहे. कळमनुरी येथे संतोष विरुद्ध संतोष लढत असताना त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आपला डाव कशाप्रकारे टाकणार कारण २०१९च्या निवडणुकीत वंचित चे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. वंचित नेत्यांचा उमेदवार जाहीर केला असून डॉक्टर दिलीप मस्के यांना उमेदवारी दिली आहे. डॉक्टर दिलीप मस्के मागील अनेक वर्षापासून सक्रिय राजकारणात सहभागी आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस वंचित बहुजन आघाडी यांचे उमेदवार अजित मगर यांनी सुद्धा दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्यांना ६६ हजाराच्या वर मते होती. वंचित बहुजन आघाडी यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघांमध्ये आहे. वंचित बहुजन आघाडी कडून दिलीप मस्के यांना उमेदवारी घोषित झाल्यापासून आपल्या प्रचाराला ते लागले आहे. आपल्या विजयचा दावा देखील करत आहे. हा सर्व कार्यक्रम जोरात सुरू असताना. मतदार संघातील विकासाचा प्रश्न काय म्हणत आहे. हे बघूया कलमनुरी मतदार संघात विकासाचे प्रश्न अगदी जशास तसे आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित युवकांमध्ये बेरोजगारी शेतकऱ्यांच्या पिकांना मिळत नसलेल्या हमीभाव त्याबरोबर अतिवृष्टी मुळे एकूण नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात असंतुष्ट आहे. मूलभूत सुविधांचे प्रश्न त्यामध्ये रुग्णालयाचा प्रश्न रुग्णांना उपचार घेण्यासाठी कधी नांदेडला कधी छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागते. तर कधी मुंबई सारख्या ठिकाणी उपचारासाठी जावे लागते. उच्च शिक्षणाचा पण तेच हाल आहे. पुणे मुंबईकडे धाव घेताना दिसतात. राज्य सरकारचा नागपूर गोवा जोडणारा शक्तीपीठ महामार्ग याच मतदारसंघातून जात आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. यामुळे अनेक शेतकरी नाराज आहे. ते या वेळेस कोणती भूमिका घेतील ते आपल्याला पाहावे लागणार आहे. सर्व समस्या अगदी जशास तसे असून या सर्व प्रश्नांमुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. तर या ठिकाणी ही जी लढत आहे.संतोष विरुद्ध संतोष आता कशाप्रकारे होणार आहे. हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला नक्कीच मिळणार आहे.

48
2555 views