logo

लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या प्रचार सभा साठी पंकजाताई मुंडे बोधडी येते आले.

📍बोधडी ता.किनवट जि.नांदेड

किनवट- माहूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. भीमराव केराम यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहिर सभेस उपस्थित राहिले. तत्पुर्वी, गावकऱ्यांनी आदिवासी नृत्य करून पारंपारिक पध्दतीने स्वागत केले.

रेणुका मातेच्या या पवित्र भूमीत विकासाची गंगा आणणारे आपले आमदार भीमरावजी केराम यांना पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून देऊन भाजपा आणि महायुतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन करण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन उपस्थितांना केले. या सभेस तालुक्यातील महिला भगिनी, जेष्ठ मंडळी आणि युवकांची मोठी उपस्थिती होती.

1
1357 views