साहस व निसर्ग शिबिर २०२४ खालापूर येथे पार पडले*
नेचर फ्रेण्ड सोसायटी ( NFS ) पनवेल यांनी
आयोजित केलेल्या साहस व निसर्ग शिबिर २०२४ खालापूर येथे मंगळवार दि . ५ व बुधवार दि . ६ नोव्हेंबर २०२४ रोजी यशस्वीरीत्या पार पडले .
*साहस व निसर्ग शिबिर २०२४ खालापूर येथे पार पडले*
नेचर फ्रेण्ड सोसायटी ( NFS ) पनवेल यांनी
आयोजित केलेल्या साहस व निसर्ग शिबिर २०२४ खालापूर येथे मंगळवार दि . ५ व बुधवार दि . ६ नोव्हेंबर २०२४ रोजी यशस्वीरीत्या पार पडले .
या साहस व निसर्ग शिबिरात शैक्षणिक , नैसर्गिक , ऐतिहासिक व ॲडवेंचर या उपक्रमांचा समावेश होता . त्या मध्ये वनऔषधी वनस्पती ओळख , जंगल हायकिंग व ट्रेकिंग , गेम्स , मनोरंजनासाठी खेळ , मातीच्या वस्तू बनविणे , चुलीवर जंगल स्वयंपाक तयार करणे , कॅम्प फायर , व्यायाम , रात्रीचा पहारा , रेनडांन्स , स्विमिंग पूल , आर्चरी , रायफल शूटिंग , झिपलाईन, बर्माब्रिज , स्मरणभूमी उबखिंड दर्शन व त्या विषयी एतिहासिक माहिती देण्यात आली .
पक्षी निरीक्षण , वन्यजीव बद्दल आणि त्याच बरोबर दि . ५ ते दि . १२ नोव्हेंबरदरम्यान साजरा केल्या जाणार्या पक्षी सप्ताहानिमित्त पक्षी व त्यांचे महत्व या विषयी pptx द्वारे माहिती देण्यात आली .
या शिबिरात एकूण २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .
डॉ. निखिल भोपळे , आर्यन उदरे , दिलीप राहुलकर व नेचर कँप साईटवरचे आकाश यांनी शिबिरात मार्गदर्शन केले .
नेचर फ्रेण्ड सोसायटी ( NFS ) संस्थेचे अध्यक्ष श्री . संतोष उदरे , सौ . ममिता संतोष उदरे आणि निसर्ग विज्ञान संस्थेचे अभ्यासक श्री . वैभव कुलकर्णी व संस्थेच्या सदस्या यांच्या शुभहस्ते सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले .