logo

राज्य उत्पादनशुल्क ॲक्शन मोडवर राहुरीत हातभट्टी बनविणारे कारखाने नष्ट....

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राहुरीत मोठी कारवाई केली. ३५ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत ४ वेगवेगळे गुन्हे दोखल केल्याची माहिती निरीक्षक चंद्रकांत रासकर यांनी दिली.

विधानसभेच्या पार्श्वभुमीवर गुन्हा अन्वेशन मोहिमेअंतर्गत अवैध देशीविदेशी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका हाती घेतला आहे. राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक रासकर यांसह दुय्यम निरीक्षक शितल पाटील, एम.बी.साबळे, एस.बी. विधाटे, जवान निलेश बुरा, सचिन गुंजाळ, दिलीप पवार, अंकुश कांबळे, जिया पठाण, सोनम पठाण, सुजाता डोंगरे यांच्या पथकाने राहुरी परिसरात कारवाई केली. देवळाली प्रवरा, धामोरी, विळद परिसरात छापेमारी करण्यात आली. हातभट्टी, अवैध

"अवैध दारुभट्टी, गावठी दारू निर्मिती, वाहतूक विक्री, अवैध ढाब्यावर होणारी दारू विक्री आदी ठिकाणी पथकाची नजर आहे. छापेमारीत सातत्य राखत प्रशासनाकडून कारवाई सुरूच राहणार आहे.

चंद्रकांत रासकर, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, राहुरी.

दारु निर्मिती करणारे कारखाने तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई झाली. राज्य उत्पादन शुल्ककडून वेगवेगळ्या प्रकरणात ४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. ५०० लिटर रसायण, ११० लिटर हातभट्टी दारू तसेच ३५ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ६ जणांवर गुन्हे दाखल असून यापुढील काळातही कारवाई सुरूच राहणार असल्याचे दारू उत्पादन शुल्कने सांगितले.

3
566 views