logo

सुकापूर ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चाहूशेठ पोपेटा यांची भाजपमध्ये घरवापसी

सुकापूर ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चाहूशेठ पोपेटा यांची भाजपमध्ये घरवापसी

पनवेल : राज भंडारी

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली असताना १८८ पनवेल विधानसभा निवडणुकीत भाजपचे मागील ३ वेळा आमदार राहिलेले प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या निवडणुकीत शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासोबत लढत आहेत. त्यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेवून आपली ताकद वाढविण्याचा प्रत्येक पक्ष तयारी करीत असतानाच पनवेल तालुक्यातील सुकापूर ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पोपेटा यांनी भारतीय जनता पक्षात घरवापसी केली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंजावात सुरु आहे. त्यांच्या विजयाची चिन्ह दिसत असतांना पोपेटा यांचा झालेला प्रवेश महत्वाचा आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे भाजप आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, किशोर सुरते, राजेश पाटील, महेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. भाजपचेच पूर्वी असलेले चंद्रकांत पोपेटा सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी शेकाप सोडून पुन्हा भाजप प्रवेश केल्याने सुकापूर विभागात प्रशांत ठाकूर यांच्या विजयाला उपयोग होऊ शकेल असे चित्र सध्यातरी दिसत आहे.

0
0 views