हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
उरण परिसरात सध्या सकाळी धुके पडत आहे. कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहत आहे, तर किमान तापमान २० ते २७ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. पावसाळ्यानंतर वाऱ्यांची स्थिती बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धूलिकण हवेतच तरंगत राहतात. या नैसर्गिक कारणांबरोबरच अनेक मानवनिर्मित कारणेही प्रदूषणात भर घालत आहेत.पावसाळ्यात येथील राष्ट्रीय महामार्गावर आलेल्या मातीची धूळ झाली आहे. या मार्गावरून दररोज हजारो जड वाहने ये-जा करीत असल्यानेे त्याचप्रमाणे शेतीच्या मळणीला सुरुवात झाल्याने उरण परिसरात धूलिकणांत वाढ झाली असल्याने हवा गुणवत्ता खालावली आहे. मात्र ही हवा हानीकारक नाही. उरणमध्ये हवा गुणवत्ता मोजण्यासाठी व्यवस्था आहे. – विक्रांत भालेराव, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळप्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार उद्भवतात. सकाळी आणि सायंकाळी धुरक्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. थंड पेये, तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत. लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी.उरण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गांवरील अवजड वाहनांची वाढती संख्या तसेच व्यावसायिक संकुले, नवे प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. वाहनांच्या धुरामध्ये अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. हे कण प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतात