निकणे,चरी, धानिवरी, गांगोडी, सोनाळे या गावात गरजु विद्यार्थ्यांना लॅपटॉप व नागरिकांना सोलर किटचे वाटप करण्यात आले.
डहाणू तालुक्यातील चरी, गंजाड, धानिवरी, निकणे, गांगोडी आणि सोनाळे या ग्रामीण भागात बुधवार, दि.०६ नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या संधी आणि नागरिकांना पर्यावरणपूरक ऊर्जा साधने उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सोलोरोन कंपनी आणि अरोरा मेथी डोनर यांच्या संयुक्त सहकार्याने लॅपटॉप आणि सोलर किटचे वितरण करण्यात आले. तसेच, निकणे ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यांवर सोलर स्ट्रीट लाईट प्रकल्पाचे उद्घाटनही झाले.
या कार्यक्रमातील लॅपटॉप वाटपाने विद्यार्थांना ई-लर्निंगच्या संधी प्राप्त होणार असून डिजिटल साधनांच्या मदतीने शिक्षण अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधनांचा वापर करून ज्ञान वृद्धिंगत करण्याचे मार्गदर्शन केले. सोलर किट वाटपाच्या माध्यमातून गावातील नागरिक आणि विद्यार्थी ऊर्जा साक्षरतेच्या दिशेने पुढे जाऊ शकतील. सोलर किटमुळे वीज समस्येचे निराकरण होऊन ऊर्जा बचतीसह पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर प्रोत्साहित केला जाईल. गावातील रस्त्यांवर सोलर स्ट्रीट लाईट लावण्यात आल्यामुळे रस्त्यांवर रात्रीच्या वेळी चांगले प्रकाशमान उपलब्ध होईल आणि ऊर्जा बचत होईल. यामुळे गावाच्या विकासात सकारात्मक बदल होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता आणि पर्यावरणपूरक ऊर्जा वापराचे महत्त्व पटवून दिले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा प्रदान करेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.प्रमुख पाहुण्यांमध्ये सोलोरों कंपनी मालक हरप्रित सिंग तिब, जलिंदर तिब,आणि प्रतिनिधी हर्षद औंधाकर , निरज मोर्या, जिग्नेश साठे, मंगेश वाखाडे , आकास तिवारी ,आणि रिया वर्मा हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपात सरपंच अभिजित देसक, सरपंच साधना बोरसा, उपसरपंच सुदाम मेरे, कौशल कामडी, सुधीर घाटाळ, विनोद मुकणे, कैलास मलावकर, भरत पुंजारा, यशवंत काटेला, भगवान कोंब, सिताराम धापशी, रामू खेवरा, प्रदिप पुंजारा,बंदु घाटाळ, रोहन घाटाळ, अशोक पऱ्हाड, रुपेश मलावकर, जननायक बिरसा मुंडा मंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.