कर्मयोगु तो पवनें । हटयोगु तो मनें । ध्यानें लयो ज्ञानें । राजयोगु ।।"
✍️
‼️जगद्गुरू श्रीहंबीरबाबा‼️‼️
आणि
‼️‼️सद्गुरू श्री. हंबीरबापुजी‼️
यांचे
💐💐उपकार व माहात्म्य 💐💐
👇
"श्रीहंबीरबाबा यांनी आपल्याला डायरेक्ट ध्यानात आणून सोडले आहे, (डायरेक्ट ध्यान करावयाची शिकवण दिली आहे), अशा अर्थाचा विचार सद्गुरू समर्थ श्री. हंबीरबापुजी यांनी आपल्या अनेक प्रवचनातून मांडला आहे. त्या प्रत्येक वेळी "म्हणजे नेमके काय?", असा प्रश्न माझ्या मनात उपस्थित होत असे. त्याचे जे उत्तरही जाणवत असे ते बरोबर असल्याचे श्रीज्ञानेश्वरकृत "योगवासिष्ठ" या पुस्तकातील पुढील ओवी वाचताना वाटले, म्हणून आपल्या सर्वांशी ती ओवी शेअर करीत आहे. अर्थात तुमचा अभिप्रायही अपेक्षित आहे -
🌻
"यम नियम तो कर्मयोगु । प्राण (प्राणायाम) प्रत्याहारु तो हटयोगु । धारणा ध्यान लययोगु । राजयोगु येरें दोन्ही ।।"
येरें दोन म्हणजे आसन व समाधि होय.
📙
श्रीसद्गुरुंनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजन सहजासनात नामस्मरण करतो. काहींचे काही प्राणायाम घडतात, काहींची काही आसनेही होतात, काहींचा लयही लागल्याचे ऐकीवात आहे, काही समाधि अवस्थेचा अनुभवही घेत असावेत. यावरून,
सद्गुरू समर्थ श्री. बापूजी जे सांगत असतात त्या उपदेशाचे माहात्म्य समजू लागते व त्यांचे आपल्यावर जे उपकार होत आहेत, ते जाणवू लागतात.
📝
वरील ओवीच्या अगोदरच्या ओवीत योगीराज श्रीज्ञानेश्वर असे का म्हणतात ते पुसटसे कळू लागते. ती ओवी अशी -
👇
"कर्मयोगु तो पवनें । हटयोगु तो मनें । ध्यानें लयो ज्ञानें । राजयोगु ।।"
✍️
थोडक्यात,
आपल्या सद्गुरुंनी आपल्याला दिलेले नामस्मरण हे विश्वाचा राजा असलेल्या आत्मारूपी देवाशी योग घडवून आणणारी सर्वोत्तम साधनारीत (देवाला आवडणारी थोर भक्ती) आहे.