logo

लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी महायुतीला विजयी करावे नरवटवाडी येथील बैठकीत युव

लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे स्वप्न

साकार करण्यासाठी महायुतीला विजयी करावे

नरवटवाडी येथील बैठकीत युवा मोर्चाचे ऋषिकेशदादा कराड यांचे आवाहन

लातूर दि.०२- लातूर ग्रामीण मतदार संघातून भाजपाचा आमदार विधानसभेत गेला पाहिजे हे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुतीचे उमेदवार आ. रमेशआप्पा कराड यांना पानगाव भागातून प्रचंड मताधिक्य मिळालेच पाहिजे अशी अपेक्षा भाजपाचे युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांनी व्यक्त केली.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रचारार्थ युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांनी रेणापूर तालुक्यातील मौजे नरवटवाडी येथे भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची आणि मित्र परिवाराची व्यापक बैठक झाली या बैठकीस माकेगाव, गोडाळा, रामवाडी (को.), कोष्टगाव, खलंग्री, पानगाव, रामवाडी (पा), मुसळेवाडी यासह विविध गावचे तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांच्या समवेत अमर चव्हाण, गणेश तुरूप, दत्ता आंबेकर, विजय चव्हाण, मारुती गालफाडे, गोपाळ शेंडगे, विनोद आंबेकर, उत्तम पवार, हरिकृष्ण गुरले यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकरी, कार्यकर्ते होते.

महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचाराशी बांधिल असलेला रेणापूर - पानगाव परिसर हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे अनेक वेळा मतदारांनी दाखवून दिले आहे असे सांगून ठिकठिकाणीच्या प्रचार बैठकीत बोलताना युवा नेते ऋषिकेशदादा कराड म्हणाले की, मतदार संघाच्या विभाजनानंतर लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाची जबाबदारी रमेशआप्पा कराड यांच्यावर देऊन या मतदार संघातून भाजपाचा उमेदवार विधानसभेत निवडून आला पाहिजे हे मुंडे साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार रमेशआप्पा कराड यांना या भागातून मोठे समर्थन आणि मताधिक्य द्यावे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत कमळाचे चिन्ह नसल्याने मुंडे साहेबांच्या विचाराच्या मतदारांनी नोटाला मतदान करणे पसंद केले. लातूर ग्रामीण मतदार संघातून नोटाला प्रचंड मताधिक्य मिळाल्यानेच भाजपा पक्षश्रेष्ठीने रमेशआप्पांना आमदार केले मिळालेल्या आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील गावागावात वाडी वस्तीत विविध विकासाच्या योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या येणाऱ्या काळात मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध जनहिताच्या योजना पुढील काळातही चालू ठेवण्यासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी कमळासमोरील बटन दाबून महायुतीचे उमेदवार आ. रमेशआप्पा कराड यांना आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावे असेही आव्हान भाजपाची युवा नेते ऋषिकेश दादा कराड यांनी केले.

53
3520 views