logo

भाऊबीज का साजरी केली जाते.? त्यामागील पौराणीक कथा काय आहे आपण जाणून घेऊया.

मुंबई : दिवाळीच्या ठीक तीन दिवसांनी भाऊबीज हा सण साजरा केला जातो.
रक्षाबंधनाप्रमाणेच भाईदूज हा देखील भाऊ-बहिणीचा सण आहे. या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करतात आणि व्रत देखील पाळतात.
भाऊबीज विषयी पौराणिक कथा काय आहे समजून घ्या...
भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचा देव म्हणजेच यमराज आपली बहीण यमुनेकडे गेला होता अशी अख्यायिका आहे.
यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेवू घालून त्याचे औक्षण केले आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. यावेली प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनाला वरदान मागण्यास सांगितले.
त्या वेळी यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये. शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला घाबरणार नाही. यमराजाने बहिणीच्या मागण्यानुसार तिला वरदान दिले.
याचा दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली असे सांगितले जाते. त्यामुळेच या दिवसाला यमद्वितीया देखील म्हटले जाते.

27
1489 views