logo

पुंजारा परिवाराचा कुलदैवत पूजन आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा थाटात पार पडला.


पालघर, बऱ्हाणपुर- दि.01 नोव्हेंबर रोजी ब-हाणपुर(पाटिलपाडा) येथे पुंजारा परिवाराने त्यांच्या कुलदैवत पूजन कार्यक्रमाची भव्य आयोजन करत एक अद्भुत सोहळा पार पाडला. या कार्यक्रमात पुंजारा परिवाराचे ब-हाणपुर,विलशेत,आकेगाव ,कासा बु,मनोर,बोरीवली, भिवंडी,पालघर, विक्रमगड येथुन अनेक सदस्य तसेच स्थानिक मान्यवरांनी सहभाग घेतला होता.सर्व प्रथम पुंजारा कुलदैवत हातोबा झोटिंग हुमाय,तांगड शंक,आवुध,यांचे पारंपरिक वाद्ये तारपा वाजवून तसेच काकडी, चवळी,नवं भात असे नैवैद्य दाखवुन पुजा अर्चा करण्यात आली व सर्व भक्तांनी कुलदैवताचे दर्शन घेतले.

कुलदैवत पूजनानंतर उपस्थितांमध्ये एकात्मता आणि भावनिक बंध दृढ होण्याची भावना निर्माण झाली.

पुंजारा परिवार कुलदैवत कार्यक्रमामध्ये परिवारातील जेष्ठ नागरिक, लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपस्थित होते.परिवाराकडुन जेष्ठ मान्यवरांचा माहदु पुंजारा, संत्या ,अंत्या, कमलाकर वामन, रविंद्र पुंजारा, अनंता,केशव,जिवन यांचा तसेच परिवारातील नवनियुक्त शिक्षकांचा साईनाथ पुंजारा, मिलिंद पुंजारा यांचा सत्कार पुंजारा परिवारातील प्रमुखांनी पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन केला. या सोहळ्यात मान्यवरांनी उपस्थितांना सदिच्छा संदेश देत आपल्या विचारांचे मोलाचे मार्गदर्शन दिले.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी ब-हाणपुर (पाटिलपाडा) येथील तरूण, तरूणी, महीला, जेष्ठ नागरिक यांनी अथक परिश्रमातून पार पाडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन भरत पुंजारा यांनी करून कार्यक्रमाची सांगता जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात केली.

25
1024 views