logo

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती आता स्थिर आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात अधिकृत पत्रक काढत माहिती दिली. गुरुवारी, ३१ ऑक्टोबरला पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीबाबत वंचितच्या अधिकृत एक्स खात्यावरून माहिती देण्यात आली. ” बाळासाहेब आंबेडकर यांच्या छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे ३१ ऑक्टोबरला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. आंबेडकर कुटुंब यावेळी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देणार नाहीत. त्यामुळे आपणास विनंती आहे की कुटुंबाच्या विनंतीचा आदर करावा कारण ते कठीण परिस्थितीला सामोरे जात आहेत”, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
परंतु त्यांच्या तब्येतीमध्ये सुधार आल्याने सुजाता आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत हॉस्पिटल पाशी कोणी गर्दी करू नये असे सुचित केले.

1
2119 views