logo

कंत्राटदाराच्या हलगर्जी पणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात..?

नांदेड - मागील काही वर्षापासून नांदेड शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शहरातील रस्ते, नाल्या, ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, स्वच्छता यावर अंकुश ठेवायचे काम महानगर पालिकेचे, पण महानगर पालिका नागरिकाना सुविधा पुरवण्या ऐवजी कर वसूल करण्यात धन्यता मानत आहे.
गेली काही दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्ते, ड्रेनेज लाईनचे काम सुरू करण्यात आले पण ते ही अत्यंत संत गतीने सुरू आहे. रस्त्याचे काम करत असताना पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देणे, ड्रेनेज लाईनचे काम करताना बॅरीकेट उभे करणे हे कंत्राट दराचे काम पण तसे होताना दिसत नाही. त्यामुळे या आधीही अनेक अपघात झाले आहे. या अपघातून शिकण्या ऐवजी तीच कृती वारंवार करण्यात येत असल्याचे दिसते.
जवाहर नगर येथील बाबानगर कडे जाणाऱ्या रस्त्याचे ड्रेनेज लाइन टाकण्याकरिता खोदकाम करण्यात आले पण सुरवातीच्या दोन दिवसात खड्डे करुन नंतर मजूर इकडे फिरकले नाही. आणि या ठिकाणी कोणतेही बॅरीकेट उभे करण्यात आले नाही. या खड्यांमुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेली १० दिवसापासून हे काम बंद आहे. दिवाळीच्या सणात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून लवकरात लवकर हे खड्डे बुझवावे, बॅरीकेट उभे करावे अशी मागणी होत आहे.

0
3004 views