रब्बी पिकासाठी शेतकऱ्यांची मशागतीची लगबग
प्रतिनिधी अमर गायकवाड कुरुळी : परतीच्या पावसाने काही ठिकाणी नुकसान कारक तर काही ठिकाणी लाभदायी ठरला आहे. कुरुळी परीसरात बहुतेक ठिकाणी काही जणांची पिके पावसामुळे जमीनदोस्त झाली. पाणथळ जमिनीवरील पिकांचे या पावसामुळे खूप नुकसान झाले कुरुळी परीसरात बहुतांश ठिकाणी पाणथळ जमिनी आहेत. पण थोड्या फार उतारावरील जमिनीवर पिके जोमात होती. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन पिक मोठ्या प्रमाणात घेण्यात आले होते. अशाच सोयाबीन पिक काढलेल्या जमिनीची मशागत करताना कुरुळी गावातील शेतकरी हिरामण कांबळे यांनी माहिती दिली. पावसाळयानंतर पडणाऱ्या थंडीत दवबिंदूंचा आधार घेऊन (सध्याच्या काळात बहुधा कृत्रिम सिंचनाचा वापर करून घेण्यात येणाऱ्या पिकांना रब्बी पिके घेतली जातात . हिवाळ्यात जे पिक घेतले जाते ते म्हणजे रब्बी पिक होय. हे पिक ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये पेरले जाते म्हणून हा पेरणी हंगाम म्हणतात. उन्हाळा लागण्याच्या वेळेस अर्थात मार्च-एप्रिलला हे पिक काढले जाते. यालाच कापणी हंगाम म्हणतात. बटाटे, जवस, कांदे, लसुण, राई, वाटाणा असे रब्बी पिकांचा समावेश आहेत. बाजरी, ज्वारी, नाचणी, गहू, हरभरा आणि इतर पाले भाज्या यांचा ही समावेश आहे तर पुढील पिक हे गहू करणार आहे असे सांगितले. पाऊस चांगला झाल्याने गहू जोमात येईल अशी अपेक्षा असुन त्याच बरोबर सहायक पिक हरभरा पीकाची पेरणी करण्यात येणार आहे.