logo

किनवट - सामाजिक कर्यकर्त्या उत्कृष्ट सामाजिक काम करणाऱ्या सौ जया गोपाल कन्नाके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा उप अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

किनवट - सामाजिक राजकीय आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे सलग पंधरा वर्षे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षनिष्ठा जपणारे आदिवासी सेवक पुरस्कृत स्व.रामदास कनाके यांची सून म्हणुन सौ. जया गोपाल कनाके यांनी आजही वारसा सांभाळत क्रांतीसूर्य बिरसा मुंडा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या अध्यक्षा या नात्याने गोर गरीब जनतेची सेवा करत शैक्षणिक, सामाजिक,आध्यात्मिक क्षेत्रात भरीव कामगिरी करत सामान्य नागरिकांची सेवा सातत्याने करीत आहेत.संस्थेच्या माध्यमातून त्या दरवर्षी शालेय विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून स्पर्धात्मक परीक्षाचे आयोजन करत पर्यावरण अनुकूल राहण्यासाठी वृक्ष लागवड करीत आहेत. मजूर,शेतकरी, अनाथ अपंग यांचे जीवनमान उंचवण्यासाठी विविध उपक्रम घेतं असतात.व्यसनाधीन, असाक्षरता, महिलांचे आजार आदी बाबत सुद्धा संस्थेच्या माध्यमातून काम करीत आहेत.कोरोनाच्या कठीण काळात ग्रामीण भागात जनजागृती करत गरजू लोकांना अन्नकिट व मास्क सॅनिटायझर वाटप केल्या आहेत.यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन लोकनेते प्रदीपजी नाईक यांच्या आदेशानुसार पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष इंजि.प्रांजली रावणगांवकर यांनी सौ.जया गोपाल कनाके रा.पिपंळगांव ता. किनवट यांची नांदेड जिल्हा ग्रामीण महिला राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड केल्या आहेत. अशा आशयाचे नियुक्तीचे पत्र लोकप्रिय नेते प्रदीप नाईक यांनी जया गोपाल कनाके यांना दिले आहे.माझ्यावर दाखविलेला विश्वास,पक्षानी दिलेली जबाबदारी कर्तव्य समजून तळागाळातील सामान्यां पर्यंत पक्षाची विचार पोहचवून पक्ष मजबूत करण्यासाठी व पक्षाची ध्येय धोरणे राबविण्यासाठी मी सदैव झटून काम करीत राहीन.असे आश्वस्त करीत जया गोपाल कनाके यांनी लोकनेते प्रदीप नाईक व पक्षातील सर्व प्रतिनिधीचे धन्यवाद मानले.यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद पवार गटाचे बहुसंख्य पक्ष प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

7
2964 views