logo

*संजय पुराम यांचे उमेदवारी अर्ज आज 28 ला: कार्यकर्ते व मतदारांना उपस्थित राहण्याचे आव्हान*

कन्हैया क्षीरसागर
विशेष प्रतिनिधी
गोंदिया(देवरी: आगामी आमगाव/देवरी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय पुराम हे उमेदवारी अर्ज आज 28 तारखेला सकाळी 11 वा.दाखल करणार आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी होण्याचा निर्धार सिद्ध करण्यासाठी ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत. यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष, कार्यकर्ते व मतदारांना देवरी येथे उपविभागीय कार्यालय येथे 11 वा. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संजय पुराम यांनी अर्ज दाखल केल्याची घोषणा झाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संजय पुराम यांचा जुना राजकीय अनुभव, त्यांची कार्यकुशलता आणि जनतेशी असलेले जवळचे नाते यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकजूट दिसून येत आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसाठी मजबूत नेतृत्वाची स्थिती निर्माण झाली असून, ही निवडणूक अन्य पक्षांच्या उमेदवारांसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.

95
4619 views