विद्यार्थ्यांनी दिला मतदारांना आकाश कंदीलातून संदेश !
मतदार जागृती निमित्य जनता विद्यालयात आकाश कंदील कार्यशाळेचे आयोजन .
पिंपळगाव सराई (बुलढाणा, महाराष्ट्र ) दि. २५ ऑक्टोबर : स्थानिक जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे आज दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ ला 'मतदान जागृती ' हा लोकशाहीचा उत्सव व 'दीपोत्सव ' हा सांस्कृतिक उत्सव या दोन्हींचे औचित्य साधून मतदार जागृती ' मतदार जागृती आकाश कंदील' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव या दृष्टीने मतदारांना आकाश कंदीलाच्या माध्यमातून संदेश देता यावा त्यासोबतच दिवाळी हा सांस्कृतिक उत्सव सुद्धा साजरा करता यावा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशील कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न या कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात आला होता . यामध्ये विद्यार्थ्यांनी सुध्दा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला .
या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यालयाचे पर्यवेक्षक भगवानराव आरसोडे यांनी केले तसेच विद्यालयाचे ग्रंथालय विभाग प्रमुख दशरथ चिभडे यांची कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती . अध्यक्षीय मार्गदर्शन करताना या कार्यशाळेचे उद्घाटक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवानराव आरसोडे यांनी विद्यार्थ्यांना कार्यशाळेची आवश्यकता आणि महत्त्व पटवून सांगितले
वेळोवेळी अशा कार्यशाळेचे आयोजन व्हावे व त्यातून गुणवंत कलाकार व देशभक्त तयार व्हावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.
उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर विद्यालयाचे कलाशिक्षक व कार्यशाळेचे संयोजक रवींद्र खानंदे यांनी आकाश कंदील बनवण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले . विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकाला उस्फूर्त प्रतिसाद दिला .
या उपक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ, चिखली चे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराजजी भाला , प्राचार्य प्रमोदजी ठोंबरे यांचे मार्गदर्शन लाभले; तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख वैशालीताई मांजाटे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींचे सहकार्य लाभले .