जनता मराठी प्राथमिक विद्यामंदीर पिंपळगाव सराई येथे विद्यार्थ्यांची दिवाळी
पिंपळगाव सराई / बुलढाणा : येथील स्थानिक जनता प्राथमिक विद्यामंदिर येथे दिनांक २६ आक्टोबर २०२४ वार शनिवार रोजी सकाळी शाळेत दीपोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख राजेद्र वायाळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निर्मला खुर्दे या होत्या.तर प्रमुख वक्ते मंगेश तरमळे होते . त्यांनी दिवाळीच्या पाच दिवसाचे महत्व विषद केले. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. लोकशाहीचा महोत्सवात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मतदान जागृती विषयी रांगोळी काढून विविध घोषवाक्याच्या माध्यमातून समाजापर्यंत संदेश पोहचेल असा प्रयत्न केला. अध्यक्षीय भाषणात सौ. निर्मला खुर्दे यांनी येणाऱ्या लोकशाहीच्या महोत्सवात आपल्या भागातील जास्तीत जास्त संख्येने मतदान कसे होईल या साठी जाणीव जागृती करावी, येणारा दिवाळीचा सन पर्यावरण पूरक कसा साजरा करता येईल या साठी प्रयत्न करावा. दररोज किमान एकादा छंद जोपासावा की ज्यामुळे आपल्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होण्यास मदत होईल यासाठी प्रयत्न करावा.याप्रसंगी मंचावर पर्यवेक्षक भगवानराव आरसोडे तसेच स्थानिक सल्लागार संजयजी जोशी, सदाशिवराव शिंदे , देशमाने भाऊ, सुमंथराव पाटील उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी सजावट केलेल्या वर्गांचे परीक्षण केले. शाळेचा सर्व.परिसर पणत्यांनी व आकाश दिव्यांनी प्रकाशमय झाला होता. अशाप्रकारे अतिशय आनंदमय वातावरणात दिप उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर विदयार्थ्यांना फराळाचे सुद्धा वाटप करण्यात आले. याप्रसंगी पांगरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री म्हस्के सर यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन दीपोत्सव कार्यक्रमाचे अवलोकन करून सर्वांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग ४ थी ची विद्यार्थीनी कु.श्रध्दा अंबादास तरमळे हिने केले. फलक लेखन शाळेचे कला शिक्षक मंगेश तरमळे यांनी केले या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.