logo

आजी - माजी सह कॉंग्रेसच्या मित्र पक्षाने भरला आमगाव विधानसभेचा अर्ज

पक्षाची उमेदवारी मलाच मिळेल विलास चाकाटे यांचा दावा...

देवरी,दि.24
आमगाव विधानसभा हा सध्या राज्यातील सर्वात जास्त चर्चेत असलेला मतदारसंघ आहे. गेली तिन टर्म इथं पुन्हा नकोची परंपरा कायम चालत आलेली आहे. यंदा 2024 च्या निवणूकीत आज (दि.24) ला आजी आमदार सहसराम कोरोटे यांनी भारतीय कॉंग्रेस पक्ष , माजी आमदार संजय पुराम यांनी भारतीय जनता पार्टी तर भारतीय कॉंग्रेस पार्टीचे मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे विलास चाकाटे यांनी आज नामांकन अर्ज दाखल केले आहे. तर शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर 28 तारखेला पुन्हा जनतेसोबत येऊन अर्ज दाखल करणार असल्याचे विलास चाकाटे म्हणाले. व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उमेदवारी आपल्याला मिळेलच, विलास चाकाटे यांचा दावा आहे.

आमगाव विधानसभेसाठी शरदचंद्र पवार यांच्याकडे विलास चाकाटे यांच्यासोबत अनेक दिग्गज उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. अशातच आज अखेर विलास चाकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर उद्या अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत. अजूनही महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा झाली नसली तरी युवा नेतृत्व व देवरी तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विलास चाकाटे हे विधानसभा मतदार संघात तळ ठोकून आहेत. त्यामुळेच आज आपल्या कार्यकर्त्यांसह समवेत आपली उमेदवारी दाखल केली. शरद पवार पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळेलच असा विश्वास विलास चाकाटे यांनी व्यक्त केला. पण जर उमेदवारी मिळाली नाही तरी आपण अपक्ष निवडणूक रिंगणात उतरणार असून आपला 100 टक्के विजय होईल असा दावा विलास चाकाटे यांनी केला आहे.

महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील...

आमगाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये मोठी रस्सीखेच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आमदार सहसराम कोरोटे, दुष्यंत किरसान, विलास चाकाटे , यांना उमेदवारी मिळवण्यासाठी लॉबिंग सुरु आहे. तर महाविकास आघाडी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आजी- माजीच्या लढाईत कॉंग्रेस मित्रपक्षाचे उमेदवार पडणार भारी...

विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजला आहे. सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागलेले होते. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या आमगाव विधानसभा मतदारसंघात 2019 ला कॉंग्रेसने काबीज केला. पण आता 2024 च्या निवडणूकीत कॉंग्रेस विरुद्ध भाजप म्हणजेच आजी - माजी आमदारांचा असा सामना बघायला मिळणार आहे. तर दुसरीकडे मित्र पक्ष असलेल्या शरद पवार पक्षाचे उमेदवार कॉंग्रेसला या 2024 च्या निवडणूकीत हरण्याचे मुख्य कारण असणार असल्याचे मतदारात चर्चा आहे. 2019 च्या निवडणूकीत भाजपाचा पराभव करत कॉंग्रेसने बाजी मारली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मित्र पक्षाच्या उमेदवाराने उमेदवारी साठी दावा केल्याने कोण बाजी मारणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय आहे
2014 ला आमगाव - देवरी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे संजय पुराम हे आमदार म्हणून निवडून आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे सहसराम कोरोटे हे आमदार झाले. त्यामुळं आता आमगाव - देवरी विधानसभा मतदार संघ पुन्हा एकदा ताब्यात घेण्याचं कॉंग्रेस समोर आव्हान ठरणार आहे. ज्यात मित्र पक्षाचे म्हणजेच शरद पवार पार्टीचे विलास चाकाटे निवडणुक लढण्यास अटळ असल्याचे त्याचा परिणाम कॉंग्रेसच्या उमेदवाराला चांगलाच भुगतावा लागनार असल्याची चर्चा आहे.

471
17649 views