अपघाताचा प्रकार नसून तो खुनाचा कट.....
दौंड ( पाटस ) प्रतिनिधी - रमेश बनसोडे.
५ लाखाची सुपारी घेऊन अपघाताचा प्रकार घडवून आणला आहे.पुन्हा एकदा दौंड तालुक्यात खळबळ पाटस हद्दीमध्ये घडली आहे.अपघाताचा प्रकार घडवून आणलेला तो पोलीसांना शंका येताच उघडीस आणला.
माहितीनुसार ही घटना काही दिवसा पूर्वी कानगाव ते पाटस रोडवर पळसे पुर्नवसन डी.पी. जवळ घडली आहे. वृत्तांत असा होता की हुंडाई कंपनीची चारचाकी या वाहनाने अज्ञात मोटार सायकल ला पाठीमागून जोरदार धडक दिली.ह्या प्रकरणात दोघा आरोपीला ताब्यात घेतले आहे.अशी माहिती पाटस पोलिसांनी दिली आहे.अटक केलेले आरोपी यांचे नाव अक्षय बबन कोळेकर.सूरज विजय पवार.हे दोघे पाटस मध्येच राहत आहे. ता.दौंड.जिल्हा.पुणे
कळलेल्या माहितीनुसार १७ ऑक्टो २०२४ रोजी रात्रीच्या ११:४५ दरम्यान पाटस कानगाव या रोड दरम्यान पळसे पुर्नवसन डी.पी.जवळ वैभव दिवेकर. रा पाटस बाजूने कानगाव या दिशेने घरी जात असता दुचाकी ( नं MH 42 C 9843 ) यास पाठीमागून येणारी ग्रे रंगाची हुंदाई कंपनीची व्हेन्यू तर नंबर नसलेली कार ने वेगात मोटार सायकल ला धडक दिली.या अपघातात वैभव गंभीर जखमी झाला आहे
ही घटना घडताच चारचाकी चालक घटना स्तळावरून फरार झाला होता.अज्ञात चालका विरुद्ध पाटस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलीसांनी पंच नामा केला.पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांना अपघाताची शंका आली.त्यानुसार पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवले.
वरिष्ठ अधिकारी यांना कल्पना देऊन तेथील उपलब्ध असलेले CCTV हाती लागताच.गुप्त माहिती द्यारे सखोल चौकशी केली असता .हा घडलेला प्रकार अपघात नाही तर तो जिवे मारण्याचा कट होता.हे तपसात उघड झाले.CCTV च्या अधारे अक्षय चव्हाण. याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी आढळले.त्याने वैभव दिवेकरला चारचाकी गाडीने धडक देऊन जिवे मारण्यासाठी अक्षय बबन कोळेकर.याने मला तसेच तुषार चोरमले .सूरज विजय पवार. रा पाटस.लाला पाटील रां. भिगवण . ता. इंदापूर. जिल्हा.पुणे.या चार जणांना ५ लाखाची सुपारी दिली असल्याचे कबूल केले.दोघा आरोपींना पाटस पोलिसांनी अटक केली आहे.तसेच पुढील तपास पाटस पोलीस करीत आहे.