logo

विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षणाला पसंती : कॉलेज विद्या

मुंबई, दि. २२ प्रतिनिधी :
भौगोलिक अडथळा दूर होणे आणि वेळेची बचत या दोन महत्वाच्या फायद्यांमुळे अधिकाधिक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देत असल्याचे कॉलेज विद्या या संस्थेच्या ‘द डिजिटल एज्युकेशन फ्रंटियर’ अहवालातून नुकतेच निदर्शनास आले. हा अहवाल विद्यार्थी आणि कामकाजी व्यक्तींमध्ये ऑनलाईन शिक्षणाचा व्यापक प्रचार-प्रसार आणि शिक्षणाच्या या नवीन स्वरूपाचा त्यांच्याकडून होणारा स्वीकार या अभ्यासावर आधारित आहे. हा अहवाल ऑनलाईन शिक्षणाचे फायदे, आव्हाने तसेच लोकांमध्ये त्याच्या विविध परिमाणांविषयीचे समज-गैरसमज यावर आधारित आहे. या संशोधनात पाच हजारांहून अधिक विद्यार्थी आणि कामकाजी व्यक्तींनी सहभाग नोंदवला.

- यामुळे विद्यार्थी देत आहेत प्राधान्य
सुमारे ८२ टक्के विद्यार्थ्यांनी आणि ६६.२ टक्के कामकाजी व्यक्तींनी सोयीनुसार केव्हाही आणि कुठूनही शिकता येण्याची सोय मान्य केली तर, ८१ टक्के विद्यार्थ्यांनी आणि ७१.१ टक्के कामकाजी व्यक्तींनी यामुळे होणाऱ्या वेळेच्या बचतीवर आपले मत व्यक्त केले. ६९ टक्के विद्यार्थी आणि ५१.९ टक्के व्यावसायिकांनी ऑनलाईन शिक्षणाला अधिक सहजसोपे म्हटले आहे

- ऑनलाईन सर्टिफिकेट्सना सर्वाधिक मान्यता
९८ टक्के विद्यार्थ्यांनी आणि ९७ टक्के कामकाजी व्यक्तींनी वर्तमान परिस्थितीत ऑनलाईन शिक्षणाच्या अस्तित्वाची दखल घेतली. मात्र प्रत्यक्षात फक्त ५३ विद्यार्थ्यांनी आणि ४६.६ टक्के कामकाजी व्यक्तींनी ऑनलाईन अभ्यासक्रम स्वीकारले आहेत. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून ऑनलाईन सर्टिफिकेट्सना सर्वाधिक मान्यता आहे; ९३ टक्के विद्यार्थी आणि ८५.७ टक्के कामकाजी व्यक्तींनी त्याची पुष्टी केली. ऑनलाईन सर्टिफिकेट्सच्या पाठोपाठ डिप्लोमा आणि डिग्रीचा क्रम येतो.

- यामुळे रोजगाराच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध
कामकाजी व्यक्तींनी ऑनलाईन शिक्षणाचे वाढते महत्त्व स्वीकारले. त्यापैकी ६७.५३ टक्के कामकाजी व्यक्तींना वाटते की, ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या अधिक चांगल्या संधी मिळू शकतात. दुसरीकडे, ३८.९६ टक्के कामकाजी व्यक्तींना वाटते की, या माध्यमातून प्रमोशन आणि पगारवाढ शक्य आहे. दूरस्थ क्षेत्रात राहून देखील अभ्यासक्रम पूर्ण करता येतात हा मोठा फायदा असल्याचे ६६.२३ टक्के लोकांनी मान्य केले.

- याचाही विचार आवश्यक
प्रतिसादकांपैकी बहुतांशी टियर १ आणि टियर २ शहरातील होते, जेथे अजूनही टेक्नॉलॉजी आणि इंटरनेटची सोय मर्यादित आहे. ग्रामीण भागात तर स्थिती अधिकच दयनीय आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या अनुपलब्धतेसह ऑनलाईन शिक्षणाच्या मार्गात अनेक अडचणी आहेत. ७० टक्के विद्यार्थ्यांच्या आणि ५८.४ टक्के कामकाजी व्यक्तींच्या मते अप्रत्यक्ष स्वरूपात दिलेले शिक्षण प्रभावी असत नाही आणि त्यात प्रायोगिक दक्षतेला स्थान नसते. ऑनलाईन शिक्षणाच्या प्रमाणपत्रांची स्वीकार्यता देखील संशयास्पद असते. अनेक प्रतिसादकांना वाटते की, ऑनलाईन डिग्रीला पारंपरिक डिग्रीसारखे मूल्य नसते. ही सर्व आव्हाने असूनही या संशोधनातून ही गोष्ट स्पष्ट झाली की, ऑनलाइन शिक्षणाचे भवितव्य खूप उज्ज्वल आहे. ६९ टक्के विद्यार्थी आणि ६८ टक्के कामकाजी व्यक्तींनी भविष्यात ऑनलाईन शिक्षण घेण्याची तयारी दाखवली.

“आमच्या या संशोधनाचा मुख्य उद्देश ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व प्रस्थापित करून विद्यार्थी आणि कामकाजी व्यक्तींमध्ये त्याच्या संधींची समज विकसित करण्याचा आहे. आम्हाला विश्वास वाटतो की, योग्य उपक्रमांमुळे ऑनलाईन शिक्षणाची विश्वासार्हता आणि उपयोगिता वाढत जाईल आणि देशभरात ऑनलाइन शिक्षणाचा अधिकाधिक स्वीकार होईल.”
रोहित गुप्ता, सीओओ, कॉलेज विद्या

16
5471 views