शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; कार्यकर्त्यांची रुग्णालयाबाहेर गर्दी
बबनदादा पाटील यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; कार्यकर्त्यांची रुग्णालयाबाहेर गर्दी
सोमवारी डिस्चार्ज घेऊन घरी परतले
पनवेल : राज भंडारी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकनिष्ठ नेते, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख तथा पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील हे गेले कित्येक दिवस नवीमुंबईतील कोपरखैरणे येथील कोकीलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल होते. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील कारण्यात आली होती. सोमवारी बबनदादा पाटील यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. दरम्यान रुग्णालयाबाहेर असंख्य कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
ऐन विधानसभा निवडणुका तोंडावर असताना बबनदादा हे कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहिलेले दिसत नव्हते. यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये पनवेल उरण महाविकास आघाडीमध्ये काही बिघाडी झाली आहे का? अशा चर्चाना उत आले होते. मात्र यामागचे कारण म्हणजे पनवेल उरण महाविकास आघाडीच्या संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील हे रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली. बबनदादा पाटील यांच्यावर नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील कोकीलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान रुग्णालयाबाहेर दादांच्या असंख्य चाहत्यांनी गर्दी केली होती. सोमवारी बबनदादा यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून प्रचार धुमाळीच्या अंतिम टप्यात बबनदादा हे तंदुरुस्त होऊन प्रचारात येतील असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे.