logo

Maharashtra Elections 2024 : मविआत वादावादी, ठाकरे गटाची मातोश्रीवर बैठक, शरद पवार अॅक्शन मोडवर, काँग्रेस हायकमांडशी चर्चा

Maharashtra Assembly Elections 2024 : शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादावादी झाली. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर नेत्यांची बैठक बोलावली. तर, दुसरीकडे दिल्लीतही हालचाली झाल्या.
विधानसभा निवडणूक जागा वाटपाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शनिवारी झालेल्या जागा वाटपाच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादावादी झाली. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर नेत्यांची बैठक बोलावली. तर, दुसरीकडे दिल्लीतही हालचाली झाल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी काँग्रेस हायकमांडशी दूरध्वनीवरून चर्चा केली

48
10191 views