logo

दलित महिलेची मृत्यू नंतर हि अंत विधीसाठी स्मशान नाकारले....

सविस्तर बातमी -
मातंग समाजातील महीलेच्या मृतदेहाला हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करू दिले नाहीत.

वज्रमुठीतल्या हिंदुत्वाला लावा काडी...!

मातंगांनो...! ओरडा आजून बेंबीच्या देठा पासून "गर्व से कहो हम हिंदू है...!"

टिप : सदर व्हिडिओ प्रवीण तरडे, प्रसाद ओक मातंग समाजातील आमदार अमित गोरखे यांना दाखवा...

"काय आहे हिंदुत्व...?
मराठ्याच्या तलवारीत, ब्राह्मणाच्या शेंडीत, माळ्याच्या भाजीत, कुंभाराच्या मातीत आणि मातंगाच्या वज्रमूठीत हिंदुत्व आहे!"
धर्मवीर---2 ट्रेलर मधील हा डायलॉग ऐकून खूप हसू आले.आज किती मराठ्यांची घरं तलवार चालवल्यामुळे चालतात...? किती ब्राह्मण शेंडी ठेवतात...? ज्या ब्राह्मणांनी शेंडी, पळी-पंचपात्र सोडली त्यांचीच प्रगती झालेली दिसून येते. अनेक भिक्षुकी करणाऱ्या ब्राह्मण तरुणांची लग्न फक्त त्यांच्या व्यवसायामुळे होत नाहीत तर आधुनिक शिक्षण घेऊन युरोप, अमेरिकेत नोकऱ्या करणाऱ्या ब्राह्मण मुलांना लग्नाच्या मार्केटमध्ये खूप मान मिळतो, असे का?
अनेक कुंभार आणि मातंग आधुनिक शिक्षण, आरक्षण यांच्या सहाय्याने प्रगती करत आहेत. माती आणि वज्रमुठीमुळे कोणाचे भले झाले आहे? मातंगाची वज्रमूठ असती तर त्यांना गावाबाहेर मांगवाड्यात का रहावे लागले असते? प्रसाद ओक यांच्या तोंडी असलेला सदर डायलॉग हे हिंदुत्व नसून भिकेचे डोहाळे आहेत...!अत्यंत क्लेशकारक बाब. तरीही आम्ही आमच्या जातीपुढे हिंदू लावतो.
मनुस्मृती नुसार अतिशूद्रा मध्ये मोडणाऱ्या अस्पृश्य समाज बांधवानों तुम्ही कितीही हिंदुत्वाचा आव आणा, हिंदुत्ववादी ती जातीवादी माकडं तुम्हाला तुमची जातीयतेची पायरी (लायकी ) तुम्हाला दाखवणारचं... हे लक्षात घ्या. तसे पाहता जर मयत ग्रहस्थ हे त्या गावचे रहिवासी असतील तर त्यांनी हा विधी करायचा कुठे ? या अंत्यविधीला ज्या ज्या जातीयवादी लोकांनी विरोध केला आहे त्यांच्यावर अँट्रासिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले पाहिजेत.असल्या निच विचार सारणीचा धिक्कार आहे, निषेध आहे ...!
बातमीदार - काळुराम राजगुरू, पुणे, 9604525101

30
5905 views