
ओडिशाच्या औद्योगिक विकासाच्या व्हिजनची झलक मुंबईत
मुंबई, दि. १९ प्रतिनिधी :
ओडिशाच्या औद्योगिक विकास आणि गुंतवणुकीच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा रोड शो शनिवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी मुंबईत पार पडला. दिल्लीत झालेल्या कार्यक्रमाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट रोड शोचा हा दुसरा टप्पा होता. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेला हा कार्यक्रम दि. २८ आणि २९ जानेवारी, २०२५ रोजी भुवनेश्वरमध्ये होणार असलेल्या 'उत्कर्ष ओडिशा - मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्ह २०२५' यात भागीदारीच्या संधी शोधण्यासाठी आणि ओडिशाच्या औद्योगिक प्रगतीला पुढे नेण्यासाठी एक महत्त्वाचा मंच बनेल, असा विश्वास या कार्यक्रमात उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्यासह ओडिशा सरकारचे मुख्य सचिव मनोज आहुजा, उद्योग विभागाचे मुख्य सचिव हेमंत शर्मा, उद्योगमंत्री संपद चंद्र स्वैन आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य :
- उद्योगक्षेत्रातील दिग्गज व प्रभावी व्यापाऱ्यांचा भाग
- ओडिशामधील वाढत्या आणि विकसित होत असलेल्या गुंतवणूक वातावरणावर केंद्रित धोरणात्मक चर्चा
- आयटी, कपडे, नूतनीकरणीय ऊर्जा, प्लास्टिक, रसायने आणि पेट्रोकेमिकल यासारख्या क्षेत्रांवर भर
- ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांच्या दिग्गज उद्योगपतींसोबत प्रत्यक्ष बैठका; प्रमुख क्षेत्रांमध्ये संभाव्य सहयोगाबाबत चर्चा
मुंबईत रोड शोची प्रमुख वैशिष्ट्ये :
- आयटी, रसायने, पेट्रोकेमिकल्स, उत्पादन, प्लास्टिक आणि नूतनीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमधील दिग्गजांसोबत उच्च स्तरीय व्यावसायिक संबंध
- फूड प्रोसेसिंग पार्क, गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि मल्टीमॉडल लॉजिस्टिक्स हबचा विस्तार यासारख्या उपक्रमांवर प्रकाश
- पूर्वोदय योजनेसारख्या राष्ट्रीय विकास धोरणांसोबत ओडिशामध्ये उचलली जात असलेली पावले
- ५००हुन जास्त व्यक्ती ज्यात उद्योग विश्वातील दिग्गजांचा समावेश
"ओडिशामधील व्यापार-अनुकूल वातावरणामुळे याठिकाणी अनेक संधी उपलब्ध आहेत, बीआरएपी-२०२२ मध्ये देखील हे प्रदर्शित करण्यात आले होते. सिंगल विंडो क्लियरन्स सिस्टम आणि गो-स्विफ्ट सारख्या उपक्रमांसोबत राज्यात गुंतवणूक प्रक्रिया सुव्यवस्थित आहे. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाचे स्थान, मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर आणि जागतिक बाजारपेठांपर्यंत पोहोच यामुळे ओडिशा हे औद्योगिक विकासाचे केंद्र बनले आहे. ओडिशाचे कुशल कार्यबळ आणि मजबूत प्रशासन गुंतवणूकदारांना एका उत्साही इकोसिस्टिममध्ये सहभागी होण्यासाठी आणि उत्कर्ष ओडिशा कॉन्क्लेव्ह २०२५ मध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित करत आहोत."
- मोहन चरण माझी, मुख्यमंत्री, ओडिशा