logo

भ्रातृमंडळ ,शेगाव रोड, खामगांव, जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र

*भ्रातृमंडळ खामगाव येथील इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न*
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर खामगाव येथील भ्रातृमंडळ इमारतीचा भूमिपूजन सोहळा खामगाव ग्रामीण येथील भूखंडावर मोठ्या उत्साहात पार पडला.
या भूमिपूजन सोहळ्यास उद्घाटक मा. आमदार ॲड. आकाशदादा फुंडकर, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे सचिव श्री दिलीपभाऊ नाफडे, भ्रातृमंडळ खामगाव चे अध्यक्ष अनिलजी चौधरी, खामगाव ग्रामीणच्या सरपंच सौ दाते,भ्रातृमंडळ बुलढाणा चे अध्यक्ष श्री डि. टी खाचणे, भ्रातृमंडळ बुलढाणा चे सचिव श्री डि.के देशमुख व सहसचिव श्री संजयकुमार खर्चे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संजयकुमार खर्चे यांनी केले. महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे सचिव श्री दिलीपभाऊ नाफडे यांनी जमलेल्या समाजबांधवाना संबोधन करीत सामाजिक एकता व अखंडता कायम राखण्याचे आवाहन केले तसेच भ्रातृमंडळ खामगावच्या इमारतीस बांधकामासाठी प्रारंभिकरित्या ४० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. आमदारांचे आभार व्यक्त करून पुढील वाढीव निधीसाठी अपेक्षा व्यक्त केली. आपल्या उद्घाटनपर भाषणात मा. आमदार ॲड श्री आकाशदादा फुंडकर यांनी समाजभवनाच्या बांधकामास पुरेपूर मदत करण्याचे तसेच सामाजिक कार्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी श्री अनिलजी चौधरी, श्री डी टी खाचणे सर डॉ. प्रवीण वराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मा. आमदार ॲड श्री आकाशदादा फुंडकर यांनी भ्रातृमंडळ खामगावला केलेल्या मदतीबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन भ्रातृमंडळ खामगाव चे सर्व पदाधिकारी व लेवा महिला शक्ती भ्रातृमंडळ खामगाव यांनी केले होते.
कार्यक्रमाचे संचालन संजय खर्चे यांनी व आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण वराडे यांनी केले.

भ्रातृ मंडळ खामगांव तर्फे हा सम्पूर्ण कार्यक्रम फेसबुक लाईव्ह प्रसारित करण्याला आला....🙏🏻

https://www.facebook.com/share/v/PBkJ5k4sh4BTNugp/

30
6219 views