logo

आचारसंहिता कालावधीत जिल्हा लोकशाही दिन होणार नाही



सोलापूर दि.17- अतिरिक्त मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र दि. 15 ऑक्टोबर 2024 अन्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा कार्यक्रम घोषित झाल्याने निवडणुक कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्हयामध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणुकांची आचार संहिता दि. 15 ऑक्टोबर 2024 ते 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत असल्याने शासनाचे सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक अन्वये आचार संहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करु नये असे नमूद केलेले आहे.

त्यामुळे विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 ची आचार संहिता असल्याने या कालावधीमध्ये सोलापूर जिल्हयात दरमहा पहिल्या सोमवारी होणारा जिल्हा लोकशाही दिन (माहे नोव्हेंबर 2024) मध्ये आयोजित केला जाणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी कळविले आहे.

0
154 views