जिल्हा परिषद शाळा मुंडीपार येथे कोजागिरी पौर्णिमा आनंदोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न
तिरोडा
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुंडीपार येथे दिनांक 16 ऑक्टोबर 2024 ला कोजागिरी पौर्णिमा आनंदोत्सव कार्यक्रम व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री चंपालालजी साठवणे ,उपाध्यक्ष सौ विद्याताई पटले व्यवस्थापन समितीच्या सदस्य तुरकर ताई, वर्षाताई , उकेताई,लक्ष्मीताई,शंकर भाऊ ,मनोज भाऊ यांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल नामाची शाळा भरली ह्या भजनाने सुरुवात करण्यात आली .अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर आवाजात भजन सादर केली. गावातील भजन मंडळी यामध्ये सहभागी झाले होते .आदरणीय शितल कुमार कणपटे सर यांनी सुद्धा सुंदर आवाजामध्ये भजन सादर केली .
कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय ते विद्यार्थ्यांना समजावून सांगितण्यात आले व शेवटी प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.